एज्युकेशन जॉब्स

जागतिक शिक्षण महापरिषदेचे रमेश मणगुत्ते करणार प्रतिनिधित्व

सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी (बेळगाव) : छत्तीसगड सरकारच्या वतीने येत्या 14 व 15 नोव्हेंबर रोजी रायपूर येथे होणाऱ्या जागतिक शिक्षण महापरिषदेत प्राथमिक शिक्षक रमेश मणगुत्ते (Ramesh Mangutti) हे कर्नाटक (Karnatka)राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या महापरिषदेसाठी कर्नाटक राज्यातून निवड होणारे ते एकमेव शिक्षक आहेत.

कोरोना संकटातून शिक्षण क्षेत्राला मिळालेले धडे, उत्कृष्ट शिक्षण व्यवस्थेसाठी उचलावयाची पावले, शिक्षणाचा छत्तीसगड मॉडेल, विविध राज्यातील सर्वोत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धती, शिक्षकांनी घडवलेले नवीन अविष्कार या विषयावर या महापरिषदेत चिंतन-मंथन होणार आहे. विविध राज्ये व केंद्रशाषित प्रदेशांतील एकूण 51 शिक्षकांची या महापरिषदेसाठी निवड झाली आहे. या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात केलेले नाविन्यपूर्ण कार्य आणि व्यावसायिक अध्ययन क्षमता वृद्धीसाठी दिलेले योगदान या निकषावर या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. छत्तीसगड सरकारच्या शिक्षण विभागाने कर्नाटक राज्याच्या समग्र शिक्षण अभियानच्या योजना संचालकांना पत्र लिहून मणगुत्ते यांना या परिषदेसाठी पुरस्कृत करण्यासाठी पत्र लिहिले आहे.

रमेश दत्ता मणगुत्ते हे मूळचे अंकली (ता. चिक्कोडी) येथील असून सध्या ते चिंचली (ता. रायबाग) येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. अजीम प्रेमजी फौंडेशन या बिगर शासकीय संस्थेच्या माध्यमातून शिक्षक व्यवसाय क्षमताविकास यासाठी भरीव काम केले आहे.

शिक्षण खात्याच्या गुरुचेतना कार्यक्रमात त्यांनी तयार केलेले मॉड्युल्स वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेत. छत्तीसगड रायपूर येथील महापरिषदेत देखील ते याच विषयावर आपले सादरीकरण करणार आहेत. बदलत्या काळातील नाविन्यपूर्ण शिक्षण हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे. यावर्षी त्यांना इनोव्हेटिव्ह टीचर अॅवार्ड, एज्युकेशन आयकॉन अवॉर्ड या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. किफायतशीर आणि नाविन्यपूर्ण अध्ययन सामग्री निर्मितीमध्ये त्यांनी विशेष कार्य केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT