Kasba Bypoll Election  esakal
Election News

पुणे तिथे काय उणे! मतदारांनी बाहेर पडून मतदान करावं यासाठी पुणेकरांची अनोखी शक्कल Kasba Bypoll Election

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी मतदानाला सुरूवात

रुपेश नामदास

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी सकाळी मतदानाला सुरूवात झाली आहे. भाजपने कसब्याची पोटनिवडणुक प्रतिष्ठेची केली आहे.

मात्र मागील दोन दिवसांपासून भाजप कसबा मतदारसंघात पैसै वाटप करत असल्याचे काही व्हिडीओ सोशल मिडियावर फिरत होते. मात्र आता पुणेकरांनीच ही निवडणूक हाती घेतली आहे.

कसब्यात मतदानाची शाई दाखवा आणि मोफत चहा मिळवा अशी हटके संकल्पना पाहायला मिळत आहे. या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे या निमित्त कसबा मतदारसंघातील काही नागरिकांनी अनोखा उपक्रम केला आहे.

मतदानाची शाई दाखवा आणि चहा मोफत मिळावा, तर मतदान करा आणि एक पुस्तक मोफत घरी घेऊन जा अशी ऑफर केली आहे.

इतकंच काय तर महिलांची देखील संख्या या मतदानात जास्त दिसावी म्हणून शहरातील एका फोरमने महिलांसाठी मतदान करा आणि हातावर मेहेंदी फ्री मध्ये काढून घ्या अशी देखील संकल्पना राबवली आहे.

त्यामुळे कसब्याच किती टक्के मतदान होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Ghee Adulteration : तिरुपती लाडूच्या तुपात पाम तेल आणि रसायनांचा वापर? EDकडून कंपनीच्या प्रवर्तकाला अटक

Farmer Loss Assessment : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाच ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचे आदेश

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Ancient Ganesh Idol : गणेशोत्सवात अद्भुत योग! 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलास गावात सापडली 1200 वर्षे जुनी चालुक्यकालीन प्राचीन गणेशमूर्ती अन् नंदी

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT