Katraj Dairy  Sakal
Election News

Katraj Dairy Election: ९१ उमेदवारांपैकी १० जणांची रिंगणातून माघार

निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष मतदान होणार हे उद्या (मंगळवारी) स्पष्ट होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) पंचवार्षिक निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या ९१ उमेदवारी अर्जांपैकी गेल्या तेरा दिवसांत दहा जणांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. उद्या (मंगळवार) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस दिवस आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष मतदान होणार आहे, हे उद्या (मंगळवारी) स्पष्ट होणार आहे.

या निवडणुकीसाठी येत्या २० मार्चला मतदान होणार आहे. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ मार्चला मतमोजणी केली जाणार असून, मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर केले जाणार असल्याचे कात्रज डेअरीचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी सांगितले.

जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या १६ जागा आहेत. यापैकी आजअखेरपर्यंत (ता.७) तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. बिनविरोध झालेल्यांमध्ये गोपाळ म्हस्के (हवेली), मारुती जगताप (पुरंदर) आणि भगवान पासलकर (वेल्हे) या तीन जणांचा समावेश आहे. या तीनपैकी म्हस्के आणि पासलकर हे विद्यमान संचालक असून जगताप हे नवीन आहेत. उर्वरित तेरा जागांसाठी सध्या ८१ जण निवडणूक रिंगणात आहेत. मात्र उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक जण या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतील, अशी अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली आहे.

मागील तेरा दिवसांत माघार घेणाऱ्यांमध्ये शैलेश म्हस्के (हवेली), शोभा पासलकर, माणिक पासलकर (दोघेही वेल्हे), जनाबाई खिलारी (महिला राखीव), महादेव वाडेकर, प्रकाश बांगर (दोघेही खेड), नितीन थोपटे (भोर), बाळासाहेब साकोरे (शिरूर), भाऊसाहेब नेटके (अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ) आणि संभाजी भुजबळ (नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदारसंघ).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Ladki Bahin Yojana : केवायसी करूनही मिळेना लाडक्या बहिणींना दरमहा अनुदान

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT