Sangli Politics esakal
Maharashtra Election 2024 Result

इद्रिस नायकवडींना मिळाले अजितदादांचे बळ; जयंतरावांना शह दिल्याचे बक्षीस, सांगलीला मिळाला 12 वा आमदार

Sangli Politics : इद्रिस नायकवडी (Idris Naikwadi) अखेर आमदार झाले. दोन दशकांपासून नायकवडी घराण्याची ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ अशी स्थिती होती.

विष्णू मोहिते

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत उभी फूट पाडल्यानंतर नायकवडींना आयती संधी चालून आली. त्यांनी ती साधली.

सांगली : इद्रिस नायकवडी (Idris Naikwadi) अखेर आमदार झाले. दोन दशकांपासून नायकवडी घराण्याची ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ अशी स्थिती होती. हाफिज धत्तुरे दोनदा आमदार झाले, पण नायकवडींना हुलकावणी मिळते, याची सल त्यांच्या समर्थकांच्या मनात होती. ती आज धुवून निघाली.

जयंत पाटील (Jayant Patil) यांना शह देत अजितदादांचा (Ajit Pawar) हात धरणाऱ्या इद्रिसभाईंना आमदारकीचं बक्षीस देऊन दादांनी महायुतीसाठी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यभर प्रचारासाठी हा नवा अल्पसंख्यांक चेहरा ते मैदानात उतरवतील, हे नक्की. #ElectionWithSakal

महायुती सरकारने आज सातजणांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जाहीर केले. त्यांचा शपथविधी झाला. त्यात माजी महापौर इद्रिस नायकवडी यांचा समावेश थोडा धक्कादायक ठरला. दोन महिन्यांपूर्वी त्यांचे नाव चर्चेत आले होते, मात्र प्रक्रियाच लांबली होती. आज आचारसंहिता लागू होण्याआधीचा मुहुर्त सरकारने साधला आणि नायकवडींचे घोडे गंगेत न्हाले. जिल्ह्याला बारावा आमदार मिळाला. याआधी आठ विधानसभा आमदारांसह अरुण लाड, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे तीन विधान परिषद सदस्य हे जिल्ह्यातून गेले आहेत.

इद्रिस नायकवडी हे मिरजेतील मातब्बर नेते आहेत. सन २००८ साली सांगलीच्या राजकारणात जयंत पाटील यांचा प्रवेश झाला आणि त्यामागे जे प्रमुख लोक होते त्यात इद्रिस नायकवडी यांचा समावेश होता. महाआघाडीचा प्रयोग तिथूनच आकाराला आला. काँग्रेसच्या दीर्घ सत्तेला या आघाडीने सुरुंग लावला आणि बक्षिस म्हणून इद्रिस नायकवडी यांना महापौरपदही दिले गेले, मात्र काही काळानंतर जयंतरावांनी त्यांना राजीनामा द्या, असे सांगितल्यानंतर त्यांनी आदेश डावलला. जयंतरावांनी तो प्रकार मनावर घेत मिरजेत जाऊन नायकवडींना उघड आव्हान दिले. ‘पुन्हा नायकवडी महापालिकेत दिसणार नाहीत’, असे ते म्हणाले होते. पुढच्या निवडणुकीत नायकवडी पराभूत झाले. त्यांचा मुलगा अतहर निवडून आला. जयंतरावांशी त्यांच्या संघर्षाची धार कमी झाली, मात्र सूर कधी जुळले नाहीत.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत उभी फूट पाडल्यानंतर नायकवडींना आयती संधी चालून आली. त्यांनी ती साधली. त्यांना राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. अर्थात, एवढ्यावर नायकवडींचे समाधान होईल, अशी शक्यताच नव्हती. कारण, विधानसभा, विधान परिषदेत ‘मिरजेचे नायकवडी’ गेले पाहिजेत, ही त्यांची इच्छा काही लपून राहिली नव्हती. विशेषतः मिरज मतदार संघातून अल्पसंख्यांक समुदायाचे हाफिज धत्तुरे दोनवेळा आमदार झाले. राजकारणात धत्तुरे यांच्यापेक्षा नायकडी कुटुंबाचा प्रभाव अधिक होता, त्यामुळे संधीची प्रतीक्षा अखेर आज पूर्ण झाली.

राष्ट्रवादी-नायकवडी जुने नाते

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून नायकवडी कुटुंब पक्षासोबत होते. इद्रीस यांचे वडील इलियास नायकवडी शरद पवार यांचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष होते. पक्षाच्या उभारणीसाठी राज्यभर त्यांनी दौरे केले. त्यांना आमदार केले जाईल, अशी नेहमी चर्चा होत असे. परंतु, काहीजणांनी त्यात आडकाठी घातल्याची सल इद्रिस नायकवडी सतत बोलून दाखवायचे. कुटुबीयांवरील अन्यायाच्या काळात अजितदादांनी नेहमी साथ दिली, दिलेला शब्द ते पाळतात, असा उल्लेख इद्रिसभाईंनी आमदार झाल्यानंतर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

SCROLL FOR NEXT