Rajeev Kumar 
Maharashtra Election 2024 Result

Rajeev Kumar on Media Trends: एक्झिट पोल्सचा फेक डेटा दाखवण्याचा अट्टाहास? मुख्य निवडणूक आयुक्त मीडिया ट्रेन्ड्सवर भडकले

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची निवडणूक जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मतदान पार पडल्यानंतर अनेक माध्यम संस्था आणि सर्व्हेक्षण करणाऱ्या संस्था एक्झिट पोल्स जाहीर करतात. पण या एक्झिट पोल्सवर तसंच निकालाच्या दिवशी सुरु असलेल्या मतमोजणीच्या ट्रेन्डवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हे कसं शक्यए? या शब्दांत त्यांनी माध्यमांवर टीकेची झोड उठवली.

काय म्हणाले राजीव कुमार?

राजीव कुमार म्हणाले, नुकत्याच झालेल्या हरियानाच्या विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगानं सकाळी साडे आठ वाजता मोजणी सुरु केली होती. पण काही चॅनेल्सनी सकाळी ८ वाजून पाच मिनिटांनी मतदानाचे ट्रेन्ड्स दाखवायला सुरुवात केली होती. पण हे कसं शक्य आहे? त्यांच्याकडं फेक डेटा असतो, आपले एक्झिट पोल्स खरे ठरवण्यासाठी फेक डेटा पसरवण्याचा हा प्रकार आहे.

मीडिया ट्रेन्डवर टीका

यामुळं काय होतं की, लोकांची एक्झिट पोलची एक अपेक्षा असते, त्यातच मीडिया ट्रेन्ड सुरु झाल्यानंतर त्यांच्या हिशोबानंच उमेदवार लीड करत असल्याचं भासत राहतं. पण वास्तविक खरे निकाल समोर यायला लागतात तेव्हा त्यात विरोधाभास असतो. पण यामुळं हा प्रकार गंभीर होऊ शकतो. कारण अपेक्षा आणि प्रत्यक्ष निकाल याच्यामधला फरक यावरुन आक्षेप घेतले जातात. पण यात आम्ही काही करु शकत नाही कारण आमचे हात बांधलेले आहेत. पण या देशात जेव्हा केव्हा अशी अडचण उभी राहते त्यात बदल केले जातात, असंही यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

Latest Marathi News Live Updates : निफाड प्रांत कार्यालयावर पुढील आठवड्यात मोर्चा धडकणार

SCROLL FOR NEXT