Buldhana Vidhan Sabha elections 2024 sakal
Maharashtra Election 2024 Result

Buldhana Assembly Elections 2024: राज्य सक्षम करण्याचे काम मुख्यमंत्री व महायुतीने केले: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

Buldhana Vidhan Sabha elections 2024: मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्याला सक्षम करण्याचे काम केले आहे: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

सकाळ वृत्तसेवा

मेहकर: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. ते स्वतःला कार्यकर्ते समजतात. दिवसरात्र कामात गुंतून असतात. राज्यातील लोकांचे ते लाडके मुख्यमंत्री आहेत, असे सर्वत्र दिसते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्याला सक्षम करण्याचे काम केले आहे.

असे प्रतिपादन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले ते शिवसेना जनसंवाद दिनानिमित्त स्वतंत्र मैदानात आयोजित विशाल जाहीर सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे होते.

ते पुढे म्हणाले की, संगणक परिचारकांच्या मानधनात लवकरच वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. घरी बसून राज्य चालवणाऱ्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना लोकांनी घरी बसवले. त्यांची लायकी येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना लोक दाखवतील. एकनाथ शिंदे लोकांचे अपार प्रेम लाभलेले एकमेव मुख्यमंत्री आहेत. हात दाखवा मुख्यमंत्री थांबवा, असे मुख्यमंत्री आहेत. ते सतत लोकांच्या गर्दीत असतात. शेकडो योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र सक्षम करण्याचे काम बाळासाहेबांच्या विचारावर मार्गक्रमण करीत एकनाथ शिंदे यांनी केले.

व्यासपीठावर माजी खासदार संजय निरुपम, आमदार डॉक्टर संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर, आ. भावना गवळी, विठ्ठल सरप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील खासदाराला मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय मंत्री केले. उद्धव ठाकरे यांनी दोन आमदारांच्या मंत्रीपदाच्या संधी डावलून स्वतःच्या मुलाला मंत्री केले. मी नऊ वेळा शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह घेऊनच लढलो. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिंदे व महायुती सरकारने राज्यातील सर्व समाज घटकांना शेकडो योजनांच्या माध्यमातून भरभरून दिले. पूर्वी तीस टक्के शेतकरी पीकविमा भरत होते, आता एक रुपयात पीकविमा असल्याने सर्व शेतकरी प्रस्ताव भरत आहेत.

लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद केली. पंतप्रधान मोदी हे देशाला प्रगतीकडे नेत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या संख्येने मतदान करून पुन्हा हेच सरकार आणण्याचे त्यांनी आवाहन केले.

आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी मदत झाली. शेतकरी, महिला वर्गाला त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून भरीव आर्थिक मदत केली. यावेळी भाऊसाहेब चौधरी यांचे भाषण झाले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बळीभाऊ मापारी, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुका प्रमुख सुरेशतात्या वाळूकर, भगवानराव सुलताने, शहर प्रमुख जयचंद बाठीया , बाजार समिती सभापती माधवराव जाधव, युवासेनेचे जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव, नीरज रायमुलकर, केशवराव जागृत, भूषण घोडे , भगवानराव राठोड, नितीन राऊत, हर्षल कुसळकर, हर्षल गायकवाड, कोकाटे, महिला आघाडीच्या माया म्हस्के, कविता दांदडे, अंजली गवळी, वैशाली सावजी, दत्ता खरात, मनोज जाधव, बबनराव भोसले, रामराव म्हस्के, बबनराव तुपे, मनोज जाधव, पिंटू सूर्जन, भास्करराव राऊत , हिंमतराव सानप, डॉ.काशिनाथ घुगे, रविराज रहाटे, गजेंद्र मापारी, आशा झोरे, अक्का गायकवाड, गणेश बोचरे, नंदु बंगाळे प्रामुख्याने उपस्थित होते. सभेला प्रचंड गर्दी झाली होती. संचालन जयचंद बाठीया यांनी केले.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Intel Layoffs 2025 : ‘इंटेल’ने घेतला मोठा निर्णय! यावर्षात तब्बल २४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Asia Cup 2025 स्पर्धेच्या तारखा अन् ठिकाण ठरलं! ACC अध्यक्षांची घोषणा, पण भारत-पाकिस्तान सामना...

Latest Maharashtra News Updates : पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Crime: मेव्हणीवर एकतर्फी प्रेम, साढूवर संताप; वेड्या दाजीनं दोन चिमुकल्यांना शिकार बनवलं अन्...; संतापजनक कृत्य

Kapil Patil: राष्ट्रवादीच्या खासदाराचा अजब दावा, खिल्ली उडवत माजी केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कानउघडणी

SCROLL FOR NEXT