Hiraman Khoskar Congress MLA Esakal
Maharashtra Election 2024 Result

Vidhan Sabha Election: क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेल्या आमदाराला पुन्हा लढायचयं! 'या' पक्षाकडे मागितली उमेदवारी

Hiraman Khoskar: अशात हिरामण खोसकर यांनी पुन्हा पक्षाकडे उमेदवारी मागितल्याने काँग्रेसने बंडखोरांविरोधातील आपली तलवार मान्य केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आशुतोष मसगौंडे

राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. या क्रॉस व्होटिंगचा आरोप असणाऱ्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपूरीचे खासदार हिरामण खोसकर यांचाही समावेश आहे. अशात खोसकर यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

विधान परिषद निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली होती. कारण नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरूनही आपले आमदार सांभाळता येत नाही अशी टीका काँग्रेसवर होत होती. यानंतर काँँग्रेसने आक्रमक पावित्रा घेत या सर्व प्रकरणाचा अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला पाठावला होता.

यानंतर पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र बंडखोरांवर काँग्रेस काय कारवाई करणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

अशात हिरामण खोसकर यांनी पुन्हा पक्षाकडे उमेदवारी मागितल्याने काँग्रेसने बंडखोरांविरोधातील आपली तलवार मान्य केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान हिरामन खोसकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असताना त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी समोरवारी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर खोसकर शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभा लढणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, यावर स्पष्टीकरण देत खोसकर यांनी स्पष्ट केले की, ते काँग्रेसकडूनच लढणार आहेत आणि यासाठी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी अर्ज केला आहे.

विधान परिषद निवडणुकीत काय झाले?

राज्यात नुकतीच 11 जागांसाठी विधान परिषद निवडणूक पार पडली. यामध्ये महायुतीने बाजी मारत 9 जागा जिंकल्या. या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले होते. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर यांचाही समावेश होता, असा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT