Kolhapur Assembly Elections esakal
Maharashtra Election 2024 Result

अर्ज भरण्यासाठी 24 ऑक्टोबरलाच झुंबड; गुरुपुष्यामृतचा साधणार मुहूर्त, सातपैकी सहा दिवस भरता येणार अर्ज

Kolhapur Assembly Elections : अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांचा अवधी आहे. यापैकी २७ ऑक्टोबरचा रविवार वगळता सहाही दिवस अर्ज भरता येणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत. या दहाही मतदारसंघांत प्रमुख पक्षांसह काही अपक्षही मोठ्या प्रमाणात रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी (Kolhapur Assembly Elections) २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असली, तरी गुरुपुष्यामृतचा (Gurupushyamrut 2024) मुहूर्त साधण्यासाठी बहुतांश मतदारसंघांत २४ ऑक्टोबर रोजीच अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांचा अवधी आहे. यापैकी २७ ऑक्टोबरचा रविवार वगळता सहाही दिवस अर्ज भरता येणार आहेत. विशेष म्हणजे हे सहाही दिवस शुभ आहेत. अर्ज माघारीसाठी मात्र दिवाळीनंतरच पडद्यामागच्या हालचालींना वेग येणार आहे. #ElectionWithSakal

जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत. या दहाही मतदारसंघांत प्रमुख पक्षांसह काही अपक्षही मोठ्या प्रमाणात रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. निवडणूक मग कोणतीही असली तरी स्पर्धेतील उमेदवारांकडून अर्ज भरताना चांगल्या मुहूर्ताची वाट बघितली जाते. चांगला दिवस, त्या दिवसातील चांगली वेळ याचे गणित बघूनच अर्ज भरला जाण्याची परंपरा आहे.

२२ ते २९ ऑक्टोबर या काळात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. या सात दिवसांत एकच रविवार येतो, अन्य सर्व सहाही दिवस शासकीय सुटी नसल्याने यादिवशी अर्ज भरता येणार आहेत. त्यातही २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत आहे. हा दिवस शुभ मानला जातो, त्यामुळेच याच दिवशी अर्ज भरण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात गर्दी होण्याची शक्यता आहे. २४ ऑक्टोबरशिवाय २८ व २९ ऑक्टोबर हे दिवसही चांगले आहेत. २८ ऑक्टोबरला वसुबारसने दिवाळीच्या पर्वाला सुरुवात होते, तर २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दोन्हीही दिवशी अर्ज मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे.

या उमेदवारी अर्जांची छाननी ३० ऑक्टोबरला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे एक नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत आहे. दोन नोव्हेंबरला (शनिवार) पाडवा, तर तीन नोव्हेंबरला (रविवार) भाऊबीजेची शासकीय सुटी असणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत अर्ज माघारीचा शासकीय प्रक्रिया नसेल. मात्र, चार नोव्‍हेंबरला अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच प्रत्येक मतदारसंघात माघारीच्या घडामोडींना वेग येणार आहे.

अर्ज भरताना तज्ज्ञांचा सल्ला

उमेदवारी अर्ज भरण्यास पुढच्या मंगळवारपासून (ता. २२) सुरुवात होणार असली, तरी या निवडणुकांचा मोठा अनुभव असलेल्यांकडून तत्पूर्वीच डमी अर्ज भरून तो या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तपासून घेतला जातो. अर्जासोबत जोडावी लागणारी संपत्तीची माहिती, शैक्षणिक पात्रतेसह अन्य कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याबरोबरच कायदेशीर सल्ला घेण्यासाठी अनुभवी उमेदवारांकडे वकिलांसह तज्ज्ञांची फौज कार्यरत आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांची ही प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच कार्यरत आहे. अशा यंत्रणांनाही यानिमित्ताने ‘अलर्ट’ राहण्याचा सल्ला दिला गेला आहे.

सैनिक मतदार

मतदारसंघ मतदार

  • चंदगड २११०

  • राधानगरी ११०७

  • कागल १७३१

  • कोल्हापूर द. ५०७

  • करवीर ६८१

  • कोल्हापूर उ. ९५

  • शाहूवाडी १२४४

  • हातकणंगले ४१०

  • इचलकरंजी १५९

  • शिरोळ ५९२

एकूण ८६३६

दिव्यांग मतदार

मतदारसंघ मतदार

  • चंदगड ३९११

  • राधानगरी ४२३७

  • कागल ३९४७

  • कोल्हापूर द. २४६७

  • करवीर २९७१

  • कोल्हापूर उ. ५७७

  • शाहूवाडी ३४२८

  • हातकणंगले ३१४१

  • इचलकरंजी ५४४

  • शिरोळ २४९२

एकूण २७,१२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dadar Kabutarkhana: कबुतरखाना हटवण्याच्या कारवाईला स्थानिकांचा विरोध, पालिकेची माघार

IND vs ENG 5th Test: यशस्वी जैस्वालचे फ्लाईंग किस, हार्ट साईन कुणासाठी? समोर आली ती व्यक्ती, सर्वांना वाटलं तो रोहित, पण... Video

इच्छेविरुद्ध पतीने घेतला घटस्फोट मग कॅन्सरपुढे तीही हरली; मृत्यूनंतर नवऱ्याने केले तिच्याच घरच्यांवर आरोप

Scheme: आनंदाची बातमी! महिलांना दरमहा ७००० रुपये मिळणार, नवीन महत्त्वकांशी योजनेला सुरूवात, अर्ज कसा करायचा?

Elephant Vantara Letter : मी, मी म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींचा पुढाकार ठरला बिनकामाचा..., वनताराने प्रसिद्ध केलं पत्र; म्हणाले...

SCROLL FOR NEXT