Manoj Jarange ESakal
Maharashtra Election 2024 Result

Manoj Jarange: निवडणुकीत उमेदवार उभे करायचे मात्र... मनोज जरांगेंनी समाजासमोर ठेवली एकच अट!

Manoj Jarange News: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ येत आहेत. तसेच राजकारणात अनेक हालचाली होत आहे. यावर मनोज जरांगेंनी सभा घेतली आहे. यात त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे.

Vrushal Karmarkar

ज्या विषयाला आपल्याला हात घालण्याची गरज नव्हती. ती वेळ आपल्यावर आली आहे. हा संघर्ष राजकारणासाठी नव्हता. गरजवंत मराठ्यांची राजकारण ही गरजच नव्हती. मुलांसाठी उठाव केला. आमच्या मनाला कधी शिवलेही नाही की राजकारण करायचे. माझा एक प्रश्न आहे. हिंदूमध्ये मराठा आहे की नाही? मारामाऱ्या करायच्या दंगल करायची कामे करायची असली की मराठा पाहिजे. पुन्हा म्हणायचे हिंदू खतरे मे है... असं म्हणत आज मराठा समाज आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी निवडणुकीची भूमिका सांगितली आहे. त्यांनी आज सभा घेतली होती. यावेळी ते बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले की, आता लढणे नाही तर मतदान. देशात मतदान इतिहास झाला पाहिजे. १०० टक्के मतदान करा. मतदानातून यांचे सगळे डाव उधळून टाकायचे. निवडणुकीला आपला गाव आपण सांभाळायचा. मतदान याद्या पहायच्या. दुसरे नाव आले की बघायचे. त्याकाळात भांडण करायचे नाही, असं आवाहन त्यांनी केले आहे.

यावेळी त्यांनी निवडणूक लढण्याची भूमिका सांगितली. ते म्हणाले की, तुम्ही फॉर्म भरा. आपण उमेदवार उभे करू. मात्र अजून फॉर्म भरायला वेळ आहे. चिन्ह मिळायला वेळ आहे. मग प्रचार कसा करायचं? गडबड कशाला करायची. आपल्याला जे चिन्ह मिळेल ते दोनच तासात राज्यात जाईल. चिन्हाचा लोड नाही. प्रचाराची गरज नाही. जरी लोकांनी उमेदवाराचे तोंड नाही पाहिले तर मतदान करा. तुमचे त्यांनी काम केले नाही तर मी आहे घोडे लावायला. राजकारणाचा इतका नाद लागू देऊ. आपला समाजाने संघर्ष केला आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

निवडणूक लढवण्याबाबत जरांगे म्हणाले की. पक्ष, नेत्याकडून बोलू नका समाजाकडून बोला. आंदोलन उघडे पडू देणार नाहीत हे सांगा. मला माझ्या समाजासाठी आंदोलन करणेही आहे. मला एकटे पडू देऊ नका. जिथं निवडून येतील तिथं उमेदवार उभे करावे. फक्त एससी एसटीच्या जागी उमेदवार देऊ नये. तिथं आपल्या विचारांच्या माणसाला मते देऊ, अशी अट त्यांनी समाजाला घातली आहे. जिथं उमेदवार उभे करणार नाही पण जो आपल्याला जो ५०० च्या बॉंडवर लिहून देईल त्याला मतदान देऊ. ज्याला आपली मागणी मान्य आहे, जो आपल्या विचारांचा आहे, त्याला मत द्यायला काय हरकत काय? जो लिहून देईल तो कुणाच्या पक्षाचा असेल त्याला पाठिंबा देऊ. समीकरणे जुळले नाही तर सगळेच पाडू, असं आवाहन त्यांनी समाजाला केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT