Sonia Gandhi Vidhansabha Election eSakal
Maharashtra Election 2024 Result

Sonia Gandhi Vidhansabha Election: आता तयारी विधानसभा निवडणुकांची! जिंकण्यासाठी सोनिया गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला खास गुरुमंत्र

Latest Congress Update: न्यायालयाचा हस्तक्षेप यावरून सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर प्रहार केले

सकाळ वृत्तसेवा

New Delhi: लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आत्ममग्न आणि अति आत्मविश्वास बाळगण्याची गरज नाही.

काँग्रेसची गती कायम राखण्यासाठी जिंकण्याच्या भावनेने काम करावे लागेल,’’ अशा शब्दांत काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधींनी स्वपक्षीय नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. संसद अधिवेशनादरम्यान कॉंग्रेस संसदीय पक्षाची बैठक सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली आज संसद भवन परिसरात झाली.

पक्षाध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार या बैठकीस उपस्थित होते. प्रारंभी वायनाडमधील भूस्खलनात बळी पडलेल्या नागरिकांना त्याचप्रमाणे दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये बुडून मृत्युमुखी पडलेल्या तीन विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीस सुरवात झाली.

येत्या काही आठवड्यांमध्ये महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाना या राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू- काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी नेत्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले.

त्या म्हणाल्या, ‘‘ येत्या काही महिन्यांमध्ये चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या यशाची गती टिकवून ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.

वातावरण कॉंग्रेसच्या बाजूने आहे. अतिआत्मविश्वास न बागळता आणि गाफील न राहता जिंकण्याच्या भावनाने एकजूट होऊन आपल्याला काम करावे लागेल. लोकसभा निवडणुकीचा कल पाहता कॉंग्रेसने चांगली कामगिरी पार पाडली तर राष्ट्रीय राजकारणामध्येही बदल घडून येईल.’’

भाजपचा संघ हाच आधार

उत्तर प्रदेशातील कावड यात्रा आणि यात्रेच्या मार्गातील दुकानदारांना नावे लिहिण्याची प्रशासनाकडून करण्यात आलेली सक्ती, त्यानंतर न्यायालयाचा हस्तक्षेप यावरून सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर प्रहार केले.

त्या म्हणाल्या, ‘‘ लोकसभा निवडणुकीतील मोठ्या धक्क्यातून मोदी सरकार योग्य धडा घेईल असे वाटले होते. परंतु त्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या समुदायांमध्ये फूट पाडण्याचे, भय दाखविण्याचे विभाजनवादी धोरण सुरूच ठेवले आहे.

सुदैवाने न्यायालयाने वेळेवर हस्तक्षेप केला. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागाची परवानगी देण्यासाठी अचानक नियम बदलण्यात आले. स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणविणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भाजपचा राजकीय आणि वैचारिक आधार आहे हे साऱ्या जगाला माहिती आहे.’’

कोट्यवधी नागरिक वंचित

देशात बेरोजगारी आणि महागाईवरून अस्वस्थता असल्याचा दावा करताना सोनिया गांधींनी सरकारच्या अर्थसंकल्पावर टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारचा जनगणना करण्याचा कोणताही हेतू नसल्याचा आरोप त्यांनी केला.

जातिनिहाय जनगणनेची मागणी करताना सोनिया गांधी म्हणाल्या, की ‘‘ २०२१ पासून जनगणना रखडली आहे. देशाच्या लोकसंख्येबद्दल, विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येबद्दल योग्य माहिती मिळत नसल्याने तब्बल १२ कोटी नागरिक गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT