Yugendra Pawar and Ajit Pawar ESakal
Maharashtra Election 2025 Result

Assembly Election: पवारांची ५७ वर्षांची परंपरा युगेंद्र पवार सुद्धा पाळणार! काय आहे कान्हेरी मारुतीचे बारामतीच्या निवडणुकीशी कनेक्शन?

Baramati Constituency News: युगेंद्र पवार प्रचाराला सुरुवात करणार आहेत. कन्हेरीच्या मारुतीचं दर्शन घेत ते प्रचारात उतरणार आहे. यावेळी शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

Vrushal Karmarkar

अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबत शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. तर शरद पवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या कण्हेरी मारुतीपासून होणार आहे.

याआधी युगेंद्र पवार यांचे प्रतिस्पर्धी अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. उमेदवारी दाखल करण्यासाठी अजित पवारांनी पुणे जिल्ह्याचे तहसील कार्यालय गाठले. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. त्यांनी शक्तिप्रदर्शनासाठी रॅली काढली. त्यांची दोन मुले पार्थ पवार आणि जय पवार आणि इतर पक्षाचे नेते उपस्थित होते.

युगेंद्र पवार हे उद्या सकाळी प्रचाराला सुरूवात करणार आहे. सकाळी ९ वाजता त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला फोडला जाणार आहे. शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. पवार कुटुंबियांचे श्रद्धास्थान असलेल्या कन्हेरीच्या मारुती मंदिरात प्रचाराचा शुभारंभ होईल. त्यानंतर जाहीर सभा होणार असल्याचे समोर आले आहे. यावेळी बारामतीतील जनतेला शरद पवार, सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार मार्गदर्शन करणार आहेत.

शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कन्हेरीच्या मंदिरात फोडला होता. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आहे. त्यामुळे आता पवार कुटुंबियांचे श्रद्धास्थान असलेला कण्हेरीचा मारुती कुणाला पावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान आज अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. यानंतर आता उद्या उद्या युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

Vasai Virar drainage cleanup: वसई-विरारमध्ये ५ जूनपर्यंत २०० हून अधिक नाल्यांची सफाई; फ्लड गेट्स, होल्डिंग पाँड्स अद्याप रखडले

SCROLL FOR NEXT