Amit shaha sakal
Assembly Election

J&K Election Updates: फेररचनेनंतर लगेचच निवडणुका

मतदारसंघांच्या फेररचनेची प्रक्रिया पार पडल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येतील असे अमित शहा यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सुरू असलेली मतदारसंघांच्या फेररचनेची प्रक्रिया पार पडल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येतील. राज्यातील स्थिती पूर्ववत होताच पूर्ण राज्याचा देखील दर्जा बहाल करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज केली. शहा यांच्या हस्ते आज पहिल्या जिल्हा सुशासन निर्देशांकाचे व्हर्च्युअली प्रकाशन पार पडले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच जम्मू- काश्मीरला प्राधान्य दिले आहे.(Jammu Kashmir Assembly Election)

या केंद्रशासित प्रदेशाची चौफेर प्रगती आणि विकास व्हावा म्हणून देखील प्रयत्न केले जात आहे. लोकशाही प्रक्रियेचा विचार करता फेररचनेची प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया पूर्ण होताच राज्यात विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येतील. अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. मी संसदेमध्ये देखील जम्मू- काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येईल अशी हमी दिली आहे. फक्त त्यासाठी राज्यातील स्थिती पूर्ववत होणे गरजेचे आहे.

केवळ लोकशाहीच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरचा विकास होऊ शकतो, यातूनच लोक सुखी- समाधानी होतील. लोकशाहीमुळे तरुणांना रोजगार मिळतील.

- अमित शहा, गृहमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT