uttarakhand assembly election 2022 Harish Rawat Google
Assembly Election

उत्तराखंडमध्ये भाजप विरुद्ध हरिश रावत, या मोठ्या चेहऱ्यांपैकी कोण मारणार बाजी?

सकाळ डिजिटल टीम

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी (Uttarakhand Assembly Election 2022) उद्या मतदान होत आहे. इथं धर्माच्या नावावर मतांची विभागणी होते. पण, अनेकदा पक्षातील मोठे चेहरे निवडणुकीसाठी निर्णायक ठरतात. यंदाच्या निवडणुकीत अशीच परिस्थित आहे. भाजपची थेट लढत काँग्रेसचे हरिश रावत यांच्यासोबत आहे. हरिश रावत यांच्यावर मात करणे हे भाजपसाठी (BJP) मोठे आव्हान मानले जात आहे.

उत्तराखंड निवडणुकीत भाजप सत्तेत येण्यासाठी सर्वतोपरी पर्यत्न करत आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे. मात्र, भाजपची थेट लढत काँग्रेसपेक्षा एकटे हरिश रावत यांच्याविरोधात पाहायला मिळत आहे. कारण, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस हायकमांडमधील कुठलेच नेते प्रचाराला फारसे दिसले नाहीत. सर्व जबाबदारी हरिश रावत यांच्या खांद्यावर देण्यात आली. तेव्हापासून हरिश रावत स्वतः प्रचारासाठी फिरत आहेत. काँग्रेसने हरिश रावत यांनाच उत्तराखंड निवडणुकीसाठी मोठा चेहरा बनवलं आहे.

भाजपच्या प्रचाराच्या धुरळ्यात काँग्रेसपेक्षा हरिश रावत यांच्यावर वैयक्तिक टीका-टीप्पणी झाली. भाजपने हरिश रावत यांनाच टार्गेट केले आहे. खुद्द गृहमंत्री अमित शाह यांनी देखील हरिश रावत यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. हरिश रावत यांनी उत्तराखंडसाठी खूप काही केलं आहे. आता भाजपच्या तरुण मुख्यमंत्र्यांना संधी मिळाली पाहिजे, असं स्वतः गृहमंत्री म्हणाले होते. या निवडणुकीत हरिश रावत हाच मोठा चेहरा आहे, हे सांगण्यासाठी अमित शाहांचं हे विधान पुरेसं आहे.

हरिश रावत उत्तराखंडमधील सर्वात मोठे नेते कसे बनले?

हरिश रावत यांचा काँग्रेसच्या मोठ्या निर्णयात सहभाग असतो. गेल्या वर्षी काँग्रेस हायकमांडने हरिश रावत यांना उत्तराखंड निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष बनवले होते. पण, हे पद मिळण्यापूर्वीच रावत हे उत्तराखंड निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनिती ठरवणार हे स्पष्ट झाले होते. यावेळी हरिश रावत यांच्या पसंतीच्या उमेदवारांनाच काँग्रेसने तिकीट दिले आहे. तसेच काँग्रेसने 'एक कुटुंब-एक तिकीट' हा फॉर्म्युला राबवला. पण, हरिश रावत यांच्या मुलीला तिकीट मात्र दिले. त्यामुळे या निवडणुकीत रावत हा नक्कीच मोठा चेहरा आहे. ते अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय असल्याने भाजपासाठी मोठं आव्हान आहे.

कोण आहेत मोठे चेहरे? -

भाजपचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हा भाजपचा मोठा चेहरा आहे. तसेच काँग्रेसकडून हरिश रावत मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत. आम आदमी पक्ष देखील यंदा उत्तराखंड निवडणुकीत उतरला आहे. पण, पक्षापेक्षा त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अजय कोठियाल यांनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. पण, मोठ्या चेहऱ्यांमधून कोण बाजी मारणार? हे १० मार्चला स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT