Election News

उत्तराखंड : धामी, रावत पराभूत; CM पदासाठी नवा चेहरा कोण?

मतमोजणीच्या ट्रेंडनुसार यावेळी काँग्रेसला सुमारे 20 जागा मिळतील असे दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

डेहराडून : कोणताही पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत येत नाही हा उत्तराखंडमधील (Uttarakhand Assembly Election 2022 ) निवडणुकीशी संबंधित सर्वात मोठा समज यंदा मोडला जाणार असून, यावेळी भाजप (BJP) हा विक्रम मोडून पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या जवळपास आहे. परंतु, यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर धामी (Pushkar Dhami) पराभूत झाले आहेत. एवढेच नव्हे तर, काँग्रेसचे निवडणूक प्रचार प्रमुख हरीश रावत (Harish Rawat) यांचादेखील निवडणुकीत पराभव झाला आहे.

उत्तराखंडच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपने तीन मुख्यमंत्री दिले आणि तिसरे मुख्यमंत्री धामी होते, ज्यांचा चेहरा पंतप्रधान मोदींसोबत निवडणूक प्रचारात पोस्टरवर दिसत होता. मोदींसह भाजपच्या सर्व नेत्यांनी प्रचाराच्या व्यासपीठावरून धामी यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले. मात्र, आता ते निवडणुकीत पराभूत झाल्याने भाजपसमोर मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार कोण? असे मोठे संकट उभे ठाकले आहे. याशिवाय तीनदा मुख्यमंत्रीपदाच्या जवळ आलेले सतपाल महाराज चौबत्ताखल मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.

भाजपची रणनीती काय असेल?

निवडणूक निकालातील ट्रेंडला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले की, पुष्कर सिंह धामी हे 'बलवान फलंदाज' असल्याचे सिद्ध झाले, परंतु त्यांचा पराभव आता पक्षासाठी संकट बनला आहे. पक्षाची एक प्रक्रिया असते, ज्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते. विधिमंडळ आपला नेता निवडेल आणि त्यानंतर पक्षाचे पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल असे मत ट्रेंडच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्रिवेंद्र सिंह यांनी व्यक्त केले होते.

काँग्रेससाठी मोठे संकट

कुमाऊँच्या लालकुआँ सीटवरून भाजपचे मोहन सिंग बिश्त यांनी यावेळी रिंगणात असलेल्या हरीश रावत यांचा पराभव केला. हरीश रावत हे काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिले आहेत आणि यावेळी काँग्रेसचा विजय झाल्यास त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. मतमोजणीच्या ट्रेंडनुसार यावेळी काँग्रेसला सुमारे 20 जागा मिळतील असे दिसत आहे मात्र, अशा स्थितीत हरीश रावत यांचा पराभव होणे ही पक्षासाठी मोठी समस्या बनली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT