Fat Women
Fat Women Sakal
फॅमिली डॉक्टर

प्रश्नोत्तरे

सकाळ वृत्तसेवा

माझी मुलगी ९ वर्षांची आहे. तिचे वजन कमी आहे तसेच ती वारंवार आजारी पडते. वजन वाढण्याकरता, उंची वाढण्याकरता तसेच तिचे स्वास्थ्य व्यवस्थित राहण्याकरता काही उपाय सुचवावेत.

माझी मुलगी ९ वर्षांची आहे. तिचे वजन कमी आहे तसेच ती वारंवार आजारी पडते. वजन वाढण्याकरता, उंची वाढण्याकरता तसेच तिचे स्वास्थ्य व्यवस्थित राहण्याकरता काही उपाय सुचवावेत.

- कोमल मिस्त्री, पुणे

उत्तर - सध्याच्या काळात मुलांचे आहाराकडे नीट लक्ष नसते. मुलीचा आहार संतुलित, पौष्टिक व सकस असावा. सकाळ-संध्याकाळ संतुलन चैतन्य कल्प घालून दूध देणे उत्तम. मुलीची प्रतिकारशक्ती चांगली राहण्याकरता संतुलन च्यवनप्राश, धात्री रसायन असे रसायन देणे चांगले. शारीरिक व बौद्धिक विकासाच्या दृष्टीने रोज सकाळी संतुलन अमृतशर्करायुक्त पंचामृत देणे योग्य ठरेल. आठवड्यातून किमान दोन वेळा संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलाने संपूर्ण शरीराला अभ्यंग करणे उत्तम. यामुळे मुलीचे वजन, उंची व शरीराची एकंदर वाढ नीट व्हायला मदत मिळू शकेल.

माझे वय ३२ वर्षे आहे. गेले दोन वर्षे थायरॉइडची गोळी सुरू आहे. रिपोर्टस् व्यवस्थित येतात, पण वजन वाढले आहे, चेहरा काळवंडला आहे, तसेच केस खूप गळतात. यावर काय उपाय करता येईल?

- ज्योती

उत्तर - गोळ्या घेऊन रिपोर्टस् नॉर्मल आले तरी बरोबरीने थायरॉइड ग्रंथीची कार्यक्षमता वाढविणे गरजेचे असते. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक उपचार सुरू करणे आवश्यक असते. बरोबरीने घरच्या घरी संतुलन फेमिसॅन सिद्ध तेलाचा योनीपिचू वापरणे योग्य ठरेल. दैनंदिन आचरणात व्यायामाचा समावेश नक्की असावा. रोज किमान ३० मिनिटे चालणे, अनुलोम-विलोम तसेच ज्योतिध्यान करणे उत्तम ठरेल. स्वयंपाक करताना रासायनिक मिठाऐवजी नैसर्गिक मीठ किंवा सैंधव मीठ वापरणे सुरू करावे. वजन आटोक्यात राहण्याकरता संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलाचा मसाज नियमितपणे करावे. केसांसाठी हेअरसॅन गोळ्या तसेच संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेल वापरता येईल. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवून हलक्या हाताने चेहऱ्यावर संतुलन राधा फेस तेल लावावे, यामुळे कांती नितळ व्हायला मदत मिळू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT