Sunita Homemade
Sunita Homemade Sakal
फूड

खाद्यभ्रमंती : मालवणमधील सुनीता खानावळ

आशिष चांदोरकर

पुस्तकाच्या निमित्तानं मागं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाणं झालं. सकाळी पाच साडेपाचच्या सुमारास कोल्हापूरहून एसटीनं निघालो. कोल्हापूर सोडल्यानंतर सुरू झालेली वळणं एसटी मालवण स्टँडला पोहोचल्यानंतरच थांबली. या वळणदार प्रवासामुळं खाणं विसरा, मी चहादेखील घेतला नव्हता. त्यामुळं कडकडून भूक लागली होती. मालवणला उतरल्यानंतर मित्र आणि माजी सहकारी शशांक मराठे याच्यासोबत चहा आणि नाश्ता केला. मालवणमधील कामं आटोपली. गाठीभेटी झाल्या. आता वेध लागले होते आडवा हात मारण्याचे.

मालवणमध्ये सोमवार पेठेत भूमी अभिलेख कार्यालयाजवळ ‘सुनीता होममेड’ नावाची छोटेखानी घरगुती खानावळ आहे. समोरच (बहुधा) रुचिरा नावाची ‘हॉटेल कम खाणावळ’ आहे. सुनीता की रुचिरा यामध्ये शशांकनं सुनीताची निवड केली. पुढच्या वेळी मालवणला येऊ तेव्हा रुचिरामध्ये नक्की जेवणाचा आस्वाद घेऊ, असं ठरलं.

हॉटेल सुनीतामध्ये पोहोचलो. एकदम घरगुती जेवणाचा आनंद वगैरे म्हणतात तसं वाटत होतं. बांगडा, सौंदाळा, सुरमई, पॉम्फ्रेट, कालवा, कोळंबी मसाला, मोरी मटण वगैरे पर्यायांमधून माझा कायमच पसंतीचा असलेल्या सुरमईचा पर्याय निवडला. पुढं खूप प्रवास करायचा होता, त्यामुळं थोडी खबरदारी घेणं आवश्यक होतं. अन्यथा तडस लागेपर्यंत जेवण निश्चित होतं.

ऑर्डर दिल्यानंतर साधारण दहा मिनिटांनी ताट आलं. ताटात बांगड्याची करी, तव्यावर शॅलो फ्राय केलेला सुरमईचा तुकडा, सोलकढी, चपात्या आणि भात होता. एक भाजी देखील होती. कोणती आहे, ते काही कळू शकलं नाही. सुरमई म्हणजे एकदम खोबरं, हे ओघानं आलंच. थेट समुद्रातून ताटात वगैरे म्हणतात तसं काहीसं. मालक राहुल मिलिंद कांबळी यांना घरगुती मालवणी जेवणाची चव अगदी छान जमलीय.

बऱ्यापैकी घट्ट ग्रेव्हीमधला बांगड्याचा तुकडा आणि तवा फ्राय सुरमई यांनी जेवणाची लज्जत वाढविली. रंग पाहून आपण बांगड्याच्या करीकडं आकर्षित होते आणि चव घेतल्यानंतर साहजिकच प्रेमात पडतो. ‘सुनीता होममेड’ तसंच काहीसं झालं. कधीकधी बांगड्याची करी जमली असेल, तर ती सुरमई किंवा पॉम्फ्रेटपेक्षाही अधिक भाव खाऊन जाते. सुनीतामध्ये जेवतानाही त्याचा प्रत्यय येत होता. मालवणी बांगडा करीचा एक विशिष्ट गंध आणि चव घेतल्यानंतर अक्षरशः वेड लागतं.

सोलकढी दिलेल्या वाटीचा आकार पाहून पुण्यातील बादशाहीची आठवण झाली. सोलकढीची चव चांगली होती. त्यामुळं जेवणानंतर ग्लासभर सोलकढीची मागविली नि संपविली. जेवणाची चव एकदम अप्रतिम. थोडी आदरातिथ्याची जोड मिळाली तर मग ‘सोने पे सुहागा’. अर्थात, पुण्यात राहात असल्यामुळं आता सवय झालीय.

पुण्यात जागोजागी अस्सल मालवणी, ऑथेंटिक मालवणी वगैरे बोर्ड आणि हॉटेलं दिसतात. आमच्या गुरु सावंतसारखी अनेक ऑथेंटिक मालवणी चव देतातही, पण मालवणमध्ये जाऊन अगदी घरगुती पद्धतीनं बनविलेल्या जेवणावर ताव मारण्यातली मजा काही औरच...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT