Alia Bhatt Sakal
फूड

ग्लॅम-फूड : ‘आलू फ्राय’ अतिशय प्रिय

आलिया भट्टला भारतीय पद्धतीच्या सगळ्याच पाककृती आवडतात. विशेषतः शाकाहारी घरगुती पद्धतीने बनवलेल्या जेवणालाच आलिया प्राधान्य देते.

सकाळ वृत्तसेवा

- आलिया भट्ट

आलिया भट्टला भारतीय पद्धतीच्या सगळ्याच पाककृती आवडतात. विशेषतः शाकाहारी घरगुती पद्धतीने बनवलेल्या जेवणालाच आलिया  प्राधान्य देते. तिला सगळ्याच प्रकारच्या भाज्या आवडतात; पण त्यातला त्यात टोमॅटोची भाजी तिला अधिक रुचते.

आलिया आहारात जास्तीत जास्त लोहयुक्त पदार्थांचा समावेश कसा करता येईल, याकडे लक्ष देते. अँटिऑक्सिडन्टचा स्रोत असणारी  फळे ती भरपूर खाते. आलू फ्राय, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी खाणे ती पसंत करते. आलियाच्या मते आलू फ्राय ही भट्ट कुटुंबीयांची सिग्नेचर डिश आहे. ‘आलू अँड चॉकलेट्स आर माय फेव्हरेट्स’ अशी स्टोरीच तिने सोशल मीडिया अकाउंटवर टाकली होती. आलियाला गोड खाणे फारसे आवडत नसले, तरी तिला मूगडाळीचा शिरा आणि पीनट बटर खूप आवडते. आलियाचे कम्फर्ट फूड म्हणजे खिचडी, फ्रेंच फ्राईज आणि डाळ-भात आहे.

आलिया अत्यंत साधे डाएट फॉलो करते. सकाळचा नाश्ता हा दैनंदिन आहारातील सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो, त्यामुळे सकाळी शक्यतो फ्रूट प्लेट किंवा सँडविच, पोहे खाते. स्नॅक म्हणून ती मखाणे, शेंगदाणे , तर कधीकधी इडली सांबार आणि त्यासोबत शुगरफ्री कॉफी घेते. दुपारच्या जेवणात वरण-भात, पोळी-भाजी आणि सॅलड खाते. रात्रीच्या जेवणात आलिया दही-भात खाते. व्यायामानंतर ती केसर घातलेले लिंबू पाणी पिते. अधूनमधून नारळपाणी घेणेही तिला आवडते. भरपूर पाणी पिण्यामुळे त्वचा आणि एकूणच आरोग्य चांगले राहते यावर आलियाचा विश्वास आहे.

आलियाला स्वयंपाकात फारशी रुची नसली, तरी तिने एकदा रणबीर कपूरसाठी केक बेक केला होता. तिने बीटरूट सॅलड आणि चिया पूडिंगची रेसिपीसुद्धा सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली होती. चॉकलेट आइस्क्रीमची ती चाहती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT