Ashadhi Ekadashi 2024 Eat nutritious foods while fasting  eSakal
फूड

Ashadhi Ekadashi 2024 : उपवासाला होतोय पित्ताचा त्रास? खा हे पौष्टिक पदार्थ अन् पहा चमत्कार

Ashadhi Ekadashi 2024 Eat nutritious foods while fasting: पंढरीच्या लाडक्या विठूरायाची आस वारकऱ्यांना लागली असून ते विठ्ठल दर्शनासाठी आतूर झाले आहेत. उद्या म्हणजेच, आषाढी एकादशी 17 जुलै 2024 ला साजरी होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंढरीच्या लाडक्या विठूरायाची आस वारकऱ्यांना लागली असून ते विठ्ठल दर्शनासाठी आतूर झाले आहेत. उद्या म्हणजेच, आषाढी एकादशी 17 जुलै 2024 ला साजरी होणार आहे. हिंदू पंचागानुसार आषाढी एकादशीचा तिथी 16 जुलै रोजी रात्री 08:33 वाजता सुरू होणार आहे. आषाढी एकादशीची तिथी हिंदू धर्मांमध्ये सर्वात पवित्र आणि महत्वाची मानली जाते.

या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले विठ्ठल भक्त विठूरायाच्या चरणी लीन होतात. त्यामुळं संपुर्ण महाराष्ट्रांत भक्तीमय वातावरण या दिवशी पाहायला मिळतं.

या दिवशी विठुरायाची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. उपवास केला जातो. उपवास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. या दिवशी काहीजण फलाहार करतात, तर काहीजण फराळाचे पदार्थ खातात. यामध्ये साबुदाणा, भगर आणि बटाटा, रताळे यापासून बनविलेले पदार्थ खातात. मात्र या उपवासाच्या पदार्थांमुळे अनेकांना पित्ताचा त्रास होतो, तर काहींना पोटदुखीचा त्रास होऊ लागला आहे.

खरतंर उपवासाला आपल्याकडे प्रामुख्याने साबुदाणा व बटाट्यापासून तयार कलेले पदार्थ खाल्ले जातात. जसे की, खिचडी, वडे, खीर असे अनेक पदार्थ बनवून आवडीने खाल्ले जातात. पण प्रत्येकालाच साबुदाणा पचेल असं नाही.

सारखेच साबुदाण्याचे पदार्थ खाल्ले तर पोटदुखी, अ‍ॅसिडिटी, पचनासंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. पण तुम्हाला माहितीय का उपवासाच्या दिवशी साबुदाण्याला अनेक असं पर्यांय आहेत ज्यामुळं तुमचं आरोग्य शाबुत राहिलचं आणि तुम्हाला त्या आहारामधून पौष्टीक घटकदेखील मिळतील.

साबुदाण्याव्यतिरिक्त राजगिरा, रताळं, अळीव, डिंक यांसारखे पौष्टिक व हेल्दी पदार्थ खाऊ शकता. रिकाम्या पोटी या पदार्थांचे सेवन केलं तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

राजगिरा

राजगिरा हा पचायला हलका असतो. राजगिरा खाल्ल्याने वजन वाढत नाही. राजगिऱ्यामध्ये आयर्न, फॉस्फरस आणि कॅल्शियमचे प्रमाण देखील भरपूर असते. तसेच, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे या दिवशी तुम्ही राजगिरापासून बनलेले अनेक पदार्थांचे सेवन करु शकता. जसे की राजिगिऱ्याचा लाडू, वडी.

अळीव

अळीवमध्ये आयर्न, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही मिनरल्स आणि बी कॉम्प्लेक्स व कॅरोटीन हे अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. अळीव खाल्ल्याने शरीरातील फॅट्स न वाढता एनर्जी व स्टॅमिना वाढतो. त्यामुळे उपवासाला अळीव खा.

डिंका करा सेवन

डिंकामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि सोल्युबल फायबर्स असतात त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळं उपवासाच्या दिवशी डिंकाचे सेवन योग्य ठरते. डिंक भाजून फुलवून घ्या मग दुधात घालून तुम्ही खाऊ शकता.

शिंगाडा

बाजारता शिंगाड्याचे पीठसुद्धा उपलब्ध आहे. त्याचा वापर करुन तुम्ही उपवासाचे अनेक पदार्थ तयार करु शकता. शिंगाड्यामध्ये आयोडीन असते, त्यामुळे आयोडीनची कमतरता भरून काढण्यासाठी मदत होते.

रताळ

रताळ्यात कार्बोहायड्रेट्स, कॅलरीजसोबतच इसेन्शियल अमायनो अ‍ॅसिड्स देखील असते. यासोबतच आयर्न, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, क्रोमियम ही मिनरल्स सुद्धा असतात. अँटिऑक्सिडंट्सदेखील फार मोठ्या प्रमाणात असतात.

यासाठी रताळं खाणे आरोग्याला फायदेशीर ठरते. रताळं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते त्यामुळे वजन कमी करण्यात रताळं मुख्य भूमिका बजावतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

Uruli Kanchan Firing Case : बारा दिवस उलटूनही गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास नाहीच? तपासावर प्रश्न चिन्ह

Latest Marathi News Update : पंतप्रधान आणि सभापतींच्या एआय द्वारे तयार केलेल्या व्हिडिओबद्दल ९ काँग्रेस नेत्यांना नोटीस

गर्दीच्या वेळी CSMT रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! प्लॅटफॉर्ममधील रुळावर व्यक्ती झोपला, समोरून ट्रेन आली अन्...; VIDEO VIRAL

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT