food
food sakal
फूड

वरण-भात माझा आवडीचा पदार्थ - अभिनेत्री गीतांजली टिकेकर

शब्दांकन : अरुण सुर्वे

माझा आवडता पदार्थ म्‍हणजे वरण-भात आणि दिवसातून तीनवेळा तरी मी वरण-भात खाऊ शकते. सर्व भारतीयांच्‍या घरामध्‍ये वरण-भात बनवला जातो आणि डाळ, मीठ व लिंबाचा रस टाकून केलेला गरमागरम वरण-भात मला खूप आवडतो. अभिनय क्षेत्रात असल्यामुळे माझा विविध ठिकाणी प्रवास होतो. त्यामध्ये कोल्हापूरची मिसळ, इंदूरचे पोहे मला खूप आवडतात.

मी लहान असताना अनेकदा आई-वडिलांसोबत पर्यटनाला जायचे. एकदा मला तिरूपतीला जाण्‍याची संधी मिळाली आणि मी साऊथ इंडियन पदार्थांचा खूप आस्‍वाद घेतला. माझे आवडते साऊथ इंडियन पदार्थ आहेत. त्यामध्ये इडली-सांबार, डोसा खूप आवडतो.

सध्या मी ‘सोनी सब’ टीव्हीवर ‘शुभलाभ’ या मालिकेमध्ये भूमिका साकारत आहे. त्यामुळे चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे मला स्वयंपाक करायला वेळ मिळत नाही; मात्र घरी असताना माझ्या कुटुंबीयांसाठी पास्‍ता किंवा पुरणपोळी बनवण्‍याचा प्रयत्‍न करते.

मला वडे आणि सांडग्याची भाजी अजिबात आवडत नाही. माझी आई उत्तम कुक आहे आणि मला तिने बनवलेले थालीपीठ खूप आवडते. माझे वडील देखील उत्तम कुक आहेत आणि भेळ, पाणीपुरी इत्‍यादींसारखे स्‍वादिष्‍ट चाट पदार्थ ते बनवतात.

मला माझे आवडते पदार्थ बनवायला नाही, तर त्‍यांचा आस्‍वाद घ्‍यायला आवडते. तसेच, वरण-भात बनवण्‍यामागची खासियत म्‍हणजे त्‍यासाठी कोणत्‍याही विशिष्‍ट पाककलेची गरज नाही. फक्‍त कुकरमध्ये योग्‍यप्रमाणात पाणी व आवश्‍यक साहित्य टाकल्‍यानंतर चविष्‍ट वरण-भात बनतो. मला आंबेमोहर भाताचा आस्‍वाद घ्‍यायला खूप आवडतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT