Bibbojaan fame Aditi Rao Hydari favorite dish Khagina know recipe 
फूड

Aditi Rao Hydari favorite Dish: बिब्बो जानला आवडणारी खगिना डिश नेमकी आहे तरी काय?

आदितीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तिनं तिच्या आवडची पदार्थ सांगितला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बिब्बो जानं असा शब्द उच्चारला तरी सर्वांच्या डोळ्यासमोर, 'ओ सैयां हटो जाओ..तुम बड़े वह हो..धी धी धानाना..'हे रिल अन् अदिती राव हैदरीची ती अदा आठवल्या शिवाय राहणार नाही. काही दिवसांपूर्वी आदिती हिरामंडी सिरीजमधून सर्वांच्या भेटीला आली होती. त्यावेळी तिनं तिच्या 'गजगामिनी वॉक'नं सर्वांना अक्षरशः वेड लावलं होतं.

तिची ती स्टाईल प्रत्येक तरुणी फॉलो करत होत्या. इतकेच नव्हे तर तिच्यासारखा लेहेंगा परिधान करुन रिल्सदेखील बनवत. अशातच आता आदितीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तिनं तिच्या आवडची पदार्थ सांगितला आहे. आदितीला थोडी हटके डिश आवडते ज्याच नावं आहे खगिना.

eatwithaishwarya या इंस्टग्रामवर तिचा हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये ती तिच्या आवडीच्या या डिशबद्दल रेसिपी सांगताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा पदार्थ तिच्या इतका आवडीचा आहे की तिनं त्याला थेट बॉम्ब अशी उपमा दिली आहे.

तर खगिना डिश कशी बनवायची हे जाणून घेऊ.

साहित्य

अंडी

कांदा उभा चिरलेला

हिरवी मिरची उभी चिरलेली

आलं लसूण पेस्ट

7-8 लसणाच्या पाकळा

लाल तिखट

चवीनुसार मीठ

तेल गरजेनुसार

कृती

1.कढईल तेल घाला. त्यानंतर तेल चांगले गरम झालं की त्यामध्ये आलं लसून पेस्ट घाला.

2. ही पेस्ट तळल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घाला, तो गुलाबी रंग येईपर्यंत तळा शिजवून घ्या. मग त्यामध्ये हिरवी मिरची घाला, हे दोन्ही परतवा.

3. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला गरजेनुसार अंडी फोडुन घाला. पण हे फेटणार नाही याची काळजी घ्या.

4. हे झाल्यानंतर एका खलभत्त्यात फक्त लसूण आणि लाल तिखट चेचून घ्या. मग हे कढईल शिजत असलेल्या अंड्यावर पसरवा. काहीज मिनिटं हे शिजवा.

5. अंड हाफ फ्रायच शिजेल याची काळजी घ्या. त्यानंतर रेडी झाली तुमजी खगिना डिश. तुम्ही ही डिश ब्रेड किंवा चपातीसोबत सर्व्ह करु शकता.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी या वेब सिरीजमधील कामासाठी अदिती राव हैदरीला एक ते दीड कोटी रुपये मिळाल्याची चर्चा आहे. यात तिने मल्लिकाजानची मोठी मुलगी बिब्बोजानचं पात्र साकारलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT