Breakfast For Glowing Skin esakal
फूड

Breakfast For Glowing Skin : आरोग्य सुधारण्याबरोबरच चेहऱ्यावरचं तेज वाढवणारे नाश्त्याचे 8 प्रकार

नाश्ता शरीराच्या पोषणासाठी फार आवश्यक असतो. तो योग्यप्रकारे करणे आरोग्यासाठी उपयुक्त.

धनश्री भावसार-बगाडे

Breakfast Options For Glowing Skin And Beauty Care In Marathi :

शरीराच्या पोषणासाठी, सुदृढ आरोग्यासाठी आणि संपूर्ण दिवसाच्या ऊर्जेसाठी नाश्ता वेळेत आणि योग्य पद्धतीने करणे फार आवश्यक असते असे अनेक आहारतज्ज्ञ सांगत असतात. पण रोज सकाळी काय बनवणार नाश्त्याला हा सर्वात मोठा प्रश्न असतो. अशावेळी पोषणाचा विचार करून काय बनवणार ही तर गंभीर समस्या असल्यासारखं वाटतं.

पण आज आम्ही तुमच्या या समस्येवर चांगला पर्याय आणला आहे. आम्ही तुम्हाला नाश्त्यासाठी असे ८ पर्याय देणार आहोत जे तुमच्या आरोग्यासाठीही चांगले आहेत शिवाय वजन नियंत्रित करते आणि चेहऱ्यावरचे तेज वाढवून सौंदर्य अधिक खुलवते. जाणून घेऊया.

Breakfast For Glowing Skin

चिया सीड्स पुडिंग

रात्रभप चीया सीड्स बदाम किंवा नाराळाच्या दूधात भिजवून फ्रिजमध्ये ठेवा. त्यात फ्रेश फळं, सुकामेवा, बेरी घालून हे पुडिंग नाश्त्याला खा. यामुळे दिवसभराच्या एनर्जीबरोबरच प्रोटीन्स आणि अनेक पोषण तत्व मिळतात. सोबतच चेहऱ्यावरील तजेलाही वाढतो.

ग्रीन स्मूदी बाउल

पालक, कोबी, केळी, बदामाचे दूध किंवा दही मिसळून मिक्सरमधून ब्लेंड करून घ्या. त्यात किवी स्लाइस , चीया सीड्स घालू शकतात.

ग्रीक योगर्ट पारफे

ग्रीक योगर्ट, फ्रेश फळं जसे स्ट्रॉबेरी, ब्लूबेरीज, आंबा यांचे लेयर्स द्या. त्यात मध घाला फ्लेक्स सीड्स एक्स्ट्रा व्हीटॅमीन म्हणून घाला. हा नाश्ता भरपूर फायबरयुक्त असल्याने पोटासाठी, पचनासाठी उत्तम आहे.

Breakfast For Glowing Skin

एवोकॅडो टोस्ट

स्मॅश केलेला अॅवोकॅडो ग्रेन टोस्टवर लावा. त्यावर टोमॅटो स्लाइस ठेवा. त्यावर लिंबू आणि काळे मिरी पूड घाला. हा शक्तीवर्धक नाश्ता आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे.

किनोआ ब्रेकफास्ट बाउल

किनोआ शिजवून ते बदाम दूध, दालचिनी आणि मधासोबत मिक्स करा. यात केळीचे काप, नट्स आणि आवडीचे कोणतेही फळ मिक्स करा. हा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता होईल.

ऑमलेट विथ व्हेजीटेबल

हे ऑमलेट बनवताना अंड्यात पालक, सिमला मिरची, टोमॅटो, मशरुम मिक्स करावे. हे ऑमलेट तव्यावर दोनही बाजूने नीट गोल्डन होईपर्यंत शेकून घ्या.

Breakfast For Glowing Skin

बेरी प्रोटीन स्मूदी

ही स्मूदी बनवणे अगदी सोपे आहे. यात स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी एक स्कूप प्रोटीन पावडर सोबत ब्लेंड करून घ्या. त्यात बदामाचे दूध मिक्स करा.

ओटमील विथ आलमंड्स अँड बेरीज

रोल्ड ओट्स दूध किंवा पाण्यासोबत शिजवा. त्यात बदामाचे काप, मेपल सिरप आणि फ्रेश बेरीज घालून हा नाश्ता खा. यातून भरपूर प्रोटीन्स, फायबर आणि एनर्जी मिळते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT