Cabbage-Cucumber Sandwich Recipe | Quick & Healthy Breakfast with Avocado sakal
फूड

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी अन् अ‍ॅव्हकाडोचं सँडविच

Healthy vegetarian sandwich with avocado: कोबी, काकडी आणि अ‍ॅव्हकाडोच्या संगतीत बनवा चविष्ट आणि पौष्टिक सँडविच – सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय!

Anushka Tapshalkar

Creamy Greek Yogurt Sandwich Recipe: नेहमीचं ब्रेड-बटर किंवा साधं भाज्यांचं सॅंडविच कंटाळवाणं वाटतंय? मग तयार करा एक असं सॅंडविच जे दिसायलाही आकर्षक आहे आणि चवीलाही भन्नाट! कोबी, काकडी, अ‍ॅव्हकाडो आणि पुदिन्याच्या कॉम्बिनेशनने तयार झालेलं हे सॅंडविच तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम फ्रेश आणि हेल्दी पर्याय आहे, कारण हे बनवायला अगदी सोपं आहे. कुरकुरीत भाज्या, क्रीमी ड्रेसिंग आणि चविष्ट मसाल्याचं हे सॅंडविच एकदा नक्की ट्राय करा!

साहित्य

सलाडसाठी :

  • १ कप बारीक चिरलेला हिरवा कोबी

  • १ कप बारीक चिरलेली काकडी

  • २ स्प्रिंग अनियन (हिरवा आणि पांढरा भाग) बारीक चिरून

  • ½ कप बारीक चिरलेली शिमला मिरची

ड्रेसिंगसाठी :

  • ½ कप दही

  • १ पिकलेलं अ‍ॅव्हकाडो (साल आणि बियाणं काढून)

  • ¼ कप ताज्या पुदिन्याच्या पानं

  • २ टेबलस्पून एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑईल

  • २–३ लहान लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या)

  • चवीनुसार मीठ आणि मिरी

सॅंडविचसाठी :

  • ६ ब्रेड स्लाइस

कृती

  1. ड्रेसिंग तयार करा – मिक्सरमध्ये दही, अ‍ॅव्हकाडो, पुदिना, ऑलिव्ह ऑईल, लसूण, मीठ आणि मिरी घालून मऊसूत पेस्ट तयार करा.

  2. सलाड बनवा – एका मोठ्या भांड्यात कोबी, काकडी, स्प्रिंग अनियन आणि शिमला मिरची एकत्र करून त्यात वरचं तयार केलेलं ड्रेसिंग मिक्स करा.

  3. सॅंडविच तयार करा – ब्रेडच्या स्लाइसवर हे मिश्रण लावा. दुसरा स्लाइस ठेवून सॅंडविच बंद करा. इच्छेनुसार टोस्ट करा किंवा तसेच थंड सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kulhad Fight Mathura Video: कुल्हड युद्ध!, मथुरेत लस्सीवाल्यांमध्ये झाली तुंबळ हाणामारी; व्हिडिओ तुफान व्हायरल

NRC Update India : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्याबाबत केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केली भूमिका!

Swiggy Boy become Deputy Collector : मानलं भावा....! ‘स्विगी’ बॉय बनला थेट डेप्युटी कलेक्टर ; वाचा, सुरजच्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट

Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या घरी मुंबई पालिका आयुक्तांची भेट, पाऊण तास नेमकी काय चर्चा झाली?

Eknath Khadse : ‘आमच्या कुटुंबीयांच्या बदनामीचे षडयंत्र’; हनी ट्रॅपबाबत मौन का? - एकनाथ खडसे यांचा सरकारला सवाल

SCROLL FOR NEXT