Swiggy Boy become Deputy Collector : मानलं भावा....! ‘स्विगी’ बॉय बनला थेट डेप्युटी कलेक्टर ; वाचा, सुरजच्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट

Suraj Yadav inspiring story : जाणून घ्या, कोणत्या परिस्थितीमधून त्याने स्वत:चं स्वप्न पूर्ण केलं, कुटुंब काय करतं अन् बरचं काही
Suraj Yadav, once a Swiggy delivery boy from rural Jharkhand, cleared JPSC to become a Deputy Collector, inspiring millions with his perseverance.
Suraj Yadav, once a Swiggy delivery boy from rural Jharkhand, cleared JPSC to become a Deputy Collector, inspiring millions with his perseverance. esakal
Updated on

From Swiggy Delivery to JPSC Success Suraj Yadav’s Journey : एखादं स्वप्न जर सत्यात उतरवायचं असेल, तर त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि त्याजोडीला जिद्द व कष्ट करण्याची तयारी लागते. कोणत्यापरिस्थितीत खचून न जाता, आलेल्या सर्व संकटांना तोंड देत आपल्या ध्येयावरून लक्ष्य विचलित होवू द्यावं लागत नाही. तर कुठं ते यश आपल्या पदरात पडतं. असंच एक उदाहरण आता समोर आलं आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर सर्वत्र तुफान चर्चा सुर आहे. याला कारणही तसंच आहे, कारण एक स्विगी फूड डिलेव्हरी बॉय थेट डेप्युटी कलेक्टर बनला आहे.

एका छोट्याशा गावातून आलेल्या आणि झारखंड लोकसेवा आयोग (जेपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊन डेप्युटी कलेक्टर बनलेल्या सूरज यादवची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. आर्थिक अडचणी, साधनांचा अभाव आणि जीवनातील सर्व अडचणी मागे टाकून सूरजने हे यश मिळवले आहे. जे हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सूरज यादवचे वडील गवंडी आहेत, जे रोजंदारीवर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घराची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट होती की कधीकधी दोन वेळचे जेवणही मिळवणे कठीण होते. पण सूरजचे मोठा सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने रांचीमध्ये राहून कठोर परिश्रम करण्यास सुरुवात केली.

Suraj Yadav, once a Swiggy delivery boy from rural Jharkhand, cleared JPSC to become a Deputy Collector, inspiring millions with his perseverance.
PM Modi Parliament : ‘’ज्यांना भारताची बाजू दिसत नाही त्यांना मी...’’ ; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत थेट इशारा!

त्याच्या या स्वप्नांचा मार्ग सोपा नव्हता. अभ्यासाचा खर्च उचलण्यासाठी सूरजने स्विगी डिलिव्हरी बॉय आणि रॅपिडो रायडर म्हणून काम करायला सुरुवात केली. खरंतर सुरुवातीला त्याच्याकडे स्वतःची बाईकही नव्हती. अशा वेळी त्याचे मित्र त्याच्या मदतीसाठी पुढे आले. सूरजने एक सेकंड हँड बाईक खरेदी केली आणि अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी दिवसाचे ५ तास काम केलं.

विशेष म्हणजे सुरजची बहीण आणि पत्नीनेही त्या कठीण काळात पूर्ण साथ दिली. त्याच्या बहिणीने घराची जबाबदारी घेतली, तर त्याच्या पत्नीने त्याला प्रत्येक पावलावर प्रोत्साहन दिलं. या जोरावर सूरजचा दिवस कामात आणि रात्र अभ्यासात घालवली.

Suraj Yadav, once a Swiggy delivery boy from rural Jharkhand, cleared JPSC to become a Deputy Collector, inspiring millions with his perseverance.
Tarachand Agarwal CA Final: मानलं बॉस...! ७१व्या वर्षी पास करून दाखवली कठीण 'CA' परीक्षा अन् स्वप्न पूर्ण केलंच

जेपीएससी मुलाखतीदरम्यान सुरजने जेव्हा सांगितले की, तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो, तेव्हा बोर्ड सदस्यांना सुरुवातीला धक्का बसला. त्यांना वाटले की कदाचित हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. पण जेव्हा त्यांनी डिलिव्हरीशी संबंधित तांत्रिक गोष्टी विचारल्या तेव्हा सूरजने अशी अचूक उत्तरे दिली की  त्यांच्या सर्वांच्या शंका दूर झाल्या आणि सूरजच्या नावासमोर डेप्युटी कलेक्टर हे पद लागलं, त्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com