Kulhad Fight Mathura Video: कुल्हड युद्ध!, मथुरेत लस्सीवाल्यांमध्ये झाली तुंबळ हाणामारी; व्हिडिओ तुफान व्हायरल

Kulhad fight in Mathura goes viral : या हाणामारीच्या घटनेमुळे बागपतमधील चाट विक्रेत्यांमधील गाजलेल्या भांडणाची आठवण सर्वांना होत आहे.
Clash between lassi vendors in Mathura over kulhads goes viral; captured video shows intense street brawl near a popular tourist spot.
Clash between lassi vendors in Mathura over kulhads goes viral; captured video shows intense street brawl near a popular tourist spot. esakal
Updated on

Kulhad War in Mathura: उत्तर प्रदेशातील मथुरा येथे घडलेल्या एका घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ज्याला आता कुल्हड युद्ध असेही म्हटलं जा आहे. प्राप्त माहितीनुसार ही घटना सोमवार २८ जुलै रोजी बरसाना येथील सुदामा चौकातील राधा राणी मंदिराच्या मुख्य रस्त्यावर घडली.  जिथे लस्सी विकणाऱ्या दोन दुकानदारांमध्ये लस्सीच्या ग्राहकांना त्यांच्या बाजूने बोलावण्यावरून जोरदार वाद झाला आणि वाद इतका वाढला की दोन्ही दुकानदारांनी एकमेकांवर जोरदार हल्ला केला.

ही घटना २०२१ मध्ये बागपतमधील चाट विक्रेत्यांमधील गाजलेल्या भांडणाची आठवण करून देत असल्याचं बोललं जात आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा सोशल मीडियावर महापूर आला होता.  तर आता मथुरेतील या कुल्हड युद्धात एकमेकांना मारण्यासाठी  शस्त्र म्हणून लस्सी घेण्यासाठी असणाऱ्या कुल्हडचाच वापर करण्यात आल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Clash between lassi vendors in Mathura over kulhads goes viral; captured video shows intense street brawl near a popular tourist spot.
Swiggy Boy become Deputy Collector : मानलं भावा....! ‘स्विगी’ बॉय बनला थेट डेप्युटी कलेक्टर ; वाचा, सुरजच्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट

प्राप्त ग्राहकांना त्यांच्या दुकानात बोलावण्यावरून सुरुवातीला वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की दोन्ही बाजूंनी काठ्या आणि कुल्हडनी एकमेकांवर हल्ला केला गेला. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन्ही बाजूचे लोक एकमेकांवर कुल्हड फेकताना दिसत आहेत. तर रस्त्यावर पळापळीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसते, तसेच या व्हिडिओमध्ये एक महिला देखील दिसत आहे, जिने देखील कुल्हड फेकून मारल्याचे दिसते. तर एका तरुणीच्या डोक्यात कुल्ड लागल्याने ती रस्त्यातच कोसळल्याचेही दिसून आले आहे.

Clash between lassi vendors in Mathura over kulhads goes viral; captured video shows intense street brawl near a popular tourist spot.
Snake Monkey Viral Video: फना काढून बसलेल्या नागाला पाहून माकडानं असं काही केलं की तुम्हीही पाहून थक्क व्हाल!

या हाणामारीत जी तरूणी जखमी झाली होती, तिला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. सुदैवाने या घटनेती  कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. परंतु या घटनेमुळे स्थानिक लोक आणि भाविकांमध्ये घबराट पसरली आहे.

Clash between lassi vendors in Mathura over kulhads goes viral; captured video shows intense street brawl near a popular tourist spot.
Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. पुन्हा कोणतीही घटना घडू नये म्हणून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com