Food Recipe chana dal recipe
Food Recipe chana dal recipe 
फूड

Food Recipe : सूजीऐवजी ट्राय करा हरभरा डाळीचा हलवा; पहा सोपी रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

चणा डाळीपासून असे अनेक पदार्थ तयार केले जातात, त्यापैकी एक खास रेसिपी आज पाहणार आहोत.

जर तुम्हाला मिठाई किंवा एखादा गोड पदार्थ आवडत असेल आणि सूजीचा शिरा खाऊन तुम्ही कंटाळा असाल तर तुम्ही घरीच चना डाळीचा हलवा करू शकता. चणा डाळ ही आरोग्यासाठी फायदेशीर असते. शिवाय चणा डाळीची खीरही आरोग्यासाठी चांगली असते, असे सांगितले जाते. प्रथिनांनी समृद्ध असेलली हरभरा डाळची (चणा डाळ) चव स्वादिष्ट असते. पुरणपोळी किंवा इतर काही पदार्थांसाठी ही वापरली जाते. चणा डाळीपासून असे अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यापैकी एक खास रेसिपी आज पाहणार आहोत. चला जाणून घेऊया चना डाळाची हलवा कसा बनवावा. ही सोप्या पद्धतीची रेसिपी असून अगदी काही काळात तयार होते. (Food Recipe chana dal recipe)

साहित्य

  • १ कप चना डाळ

  • १ कप दूध

  • १/४ वेलची पावडर

  • १ कप साखर

  • १ कप तूर

  • बदाम आवश्यकतेनुसार

  • काजू आवश्यकतेनुसार

कृती :

  • चना डाळीचा हलवा बनवण्यासाठी प्रथम ही डाळ स्वच्छ धुवून घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.

  • यानंतर, खीर बनवण्यापूर्वी डाळीतील पाणी पूर्णपणे काढून टाका.

  • यानंतर पाण्यातून काढलेली डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

  • आता तवा गरम करून त्यात तूप टाका. तूप पूर्णपणे वितळल्यावर त्यात चणाडाळीचे मिश्रण टाकून तांबूस-सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या.

  • दुसऱ्या बाजूला गॅसवर दूध उकळत ठेवा. दुधाला उकळी आली की, त्यात भाजलेल्या डाळीचे मिश्रण टाका आणि ते चांगले शिजवून ठेवा.

  • मंद आचेच्या गॅसवर हे मिश्रण ठेवून सर्व दूध शोषूण घेईपर्यंत डाळीचे हे मिश्रण ढवळत रहा.

  • यानंतर या मिश्रणात साखर आणि वेलची पावडर घाला आणि पेस्ट नीट ढवळून घ्या.

  • पुढे हे मिश्रण थोडं पातळ झाल्यासारखे दिसायला लागले की, समजा तुमचा चणा डाळीचा हलवा तयार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT