Chestnut Flour Halwa  esakal
फूड

Chestnut Flour Halwa : खाण्यास टेस्टी अन् पौष्टिक शिंगाड्याचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी

शिंगाड्याचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी

साक्षी राऊत

Chestnut Flour Halwa : उपवासात तिच तिच शाबुदाण्याची खिचडी आणि भगर खाऊन अनेकांना कंटाळा येतो. तुम्हाला उपावासात काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली किंवा असेही तुम्हाला पाहुण्यांसाठी एखादी गोड पदार्थ बनवायचा असेल तर शिंगाड्याचा हलवा बेस्ट ठरेल. मात्र अनेकांना शिंगाड्याचा शिरा बनवणे कठीण वाटते. कारण बनवताना त्याच्यात गुठळ्या होताता किंवा अनेक लोक साखरेमुळे सुद्धा हा शिरा बनवणे टाळतात. यावेळी ही वेगळी रेसिपी ट्राय करून बघा. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

शिंगाड्याचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक कप शिंगाड्याचे पिठ

एक कप गूळ पावडर

एक लहान चमचा विलायची पावडर

अर्धा कप तूप

पाणी आवश्यकतेनुसार (Recipe)

शिंगाड्याचा शिरा बनवण्याची रेसिपी

शिंगाड्याचा शिरा बनवण्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये तीन कप पाणी टाकून गरम करा. पाणी गरम झाले की त्यात गूळ पावडर घाला. आता त्याला चांगल्याप्रकारे मिसळून घ्या. आता पॅनमध्ये तूप घ्या आणि स्लो फ्लेमवर पीठ भाजून घ्या. (Food) भाजून गोल्डन झाल्यावर तुम्ही त्या काजू, बदाम आणि ड्राय फ्रूट्स टाका. त्यांगल्याप्रकारे भाजल्यानंतर त्यात गूळाचे पाणी टाका आणि हाय फ्लेमवर शिजवा. जेणेकरून पिठाच्या गुठळ्या बनू नये. शेवटी त्यात विलायची पावडर मिक्स करा. आता तुमचा शिरा बनून रेडी आहे. आता तुम्ही सर्व्ह करून गरमागरम शिऱ्याचा आनंद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT