delicious pan pasta recipe Marathi article
delicious pan pasta recipe Marathi article 
फूड

घरीच झटपट पॅन पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : तुम्हाला चीज पास्ता खाण्याची इच्छा झाली असेल आणि तो बनवण्यासाठी खूप वेळ लागेल असे जर का वाटत असेल तर तुम्ही स्वतःचे मन मारुन बसू नका. आज आपण झटपट तायर होणारा या पॅन पास्ताची रेसिपी जाणून घेणार आहोत. हा पॅन पास्ता बनवण्यासाठी तुम्हाला २० मिनिटांपेक्षा देखील कमी वेळ लागेल. तसेच या पास्ताची चव लहान मुलांसोबतच मोठ्यांना देखील आवडेल अशी आहे.  हा पास्ता खाल्ल्यानंतर तुमची सगळेजण स्तुती करतील हे नक्की.

साहित्य
2 कप उकडलेला पास्ता
2 चमचे बटर
4 चमचे बारीक कापलेला कांदा
2 चमचे लसूण पेस्ट
2 चमचे चीज स्पेड
4 चमचे किसलेले मॉझरेला चीज
1/2 कप टोमॅटो पास्ता सॉस
3 चमचे मैदा
1/4 कप पाणी
1/2 कप दूध
चवीनुसार मीठ आणि काळी मिरी

कृती
१. कढईत बटर गरम करून त्यात लसूण पेस्ट घालून दोन मिनिटे तळून घ्या.
२. आता त्यात कांदा घालून परतावा. मीठ घालून ते परतत राहा.
३.आता त्यामध्ये मैदा घाला आणि चांगले मिसळा. पाणी घाला आणि लवकर-लवकर ढवळून घ्यावे जेणेकरुन ढेकूळे तयार होणार नाहीत. आता दूध घाला.
४. मिश्रण तयार झाल्यावर पास्ता आणि चीज स्प्रेड घाला आणि चांगले मिसळा.
5. हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्या , त्यावर टोमॅटो पास्ता सॉस, मिरची आणि किसलेले चीज घालून गरम-गरम सर्व्ह करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT