Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अतिशय युनिक अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे' असे बोल असलेल्या रॅपची भुरळ नेटकऱ्यांना पडलीये. जाणून घेऊया या रॅपची इंटरेस्टिंग गोष्ट.
Majhyashi Nit Bolaycha Rap Song
Majhyashi Nit Bolaycha Rap SongESAKAL

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: सोशल मीडियावर ट्रेंड होणारी गाणी हा सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय. कधी कुठलं गाणं, रील सोशल मीडियावर व्हायरल होईल आणि लोकांमध्ये त्याची क्रेझ निर्माण होईल हे सांगणं तसं कठीण आहे. सध्या एक असंच मराठी रॅप सोशल मीडियावर गाजतंय. या रॅपचं नाव आहे 'माझ्याशी नीट बोलायचं'. 'अतिशय युनिक अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे' असे बोल असलेल्या रॅपची भुरळ नेटकऱ्यांना पडलीये. जाणून घेऊया या रॅपची इंटरेस्टिंग गोष्ट.

सोशल मीडियावर सध्या ट्रेंड होणारं हे रॅप गायलंय सुजय जिब्रीश या रॅपरने. दोन वर्षांपूर्वी भाडिपा या युट्युब चॅनेलवर हे रॅप रिलीज करण्यात आलं होतं आणि हे रॅप त्या वेळी सगळ्यांना आवडलं होत पण दोन वर्षानंतर हे रॅप खऱ्या अर्थाने व्हायरल झालंय असं म्हणायला हरकत नाही. १२ एप्रिल २०२२ ला रिलीज झालेलं हे रॅप सुजय जिब्रीश आणि आलोक राजवाडे यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. भाडिपाची अत्यंत गाजलेली सिरीज 'आई आणि मी' मधील अनी या गाजलेल्या पात्रावर हे रॅप आधारित होतं. अनी आणि आईचे गाजलेले सगळे संवाद आणि सीन्स एकत्र करून हे भन्नाट रॅप तयार करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा या रॅपची क्रेझ सोशल मीडियावर पाहायला मिळते आहे.

दोन आठवड्यांपासून हे रॅप पुन्हा ट्रेंडिंगमध्ये आलं असून अनेक सेलिब्रिटीज आणि कन्टेन्ट क्रिएटर्सनी या गाण्यावर सोशल मीडियावर रील्स शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर हे गाणं ट्रेंडमध्ये आल्यावर भाडिपाने सुद्धा सोशल मीडियावर या गाण्याचा ओरिजिनल व्हिडीओ शेअर करत त्याला 'हिडन जेम शोधायला दोन वर्षं लावली राव' असं कॅप्शन दिलंय. अनेकांनी यावर कमेंट करत त्यांना हे रॅप आवडल्याचं म्हंटलं आहे. एकाने 'मी हे गाणं लूपवर ऐकतोय' असं म्हटलंय तर एकाने 'हे मराठीमधील बेस्ट रॅप आहे.' अशी कमेंट करत कलाकारांचं कौतुक केलं आहे.

Majhyashi Nit Bolaycha Rap Song
Abeer-Gulal: 'अबीर गुलाल' मालिका येतीये प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' गाजलेल्या मालिकेचा आहे रिमेक

मराठीमध्ये वेगळ्या प्रकारचा कन्टेन्ट क्रिएट करण्यासाठी भाडिपाची टीम ओळखली जाते. ६ वर्षांपूर्वी त्यांनी आई आणि मी या सीरिजमधील पहिला व्हिडीओ शेअर केला होता. अनी, जुई आणि त्यांची आई यांच्यातील सिटकॉम या सिरीजमध्ये पाहायला मिळत होतं. त्यातील बबू तू आंघोळ केलीस का? हा आईच्या तोंडी असलेला संवाद किंवा अनी सारखं म्हणत असलेलं 'ही अतिशय युनिक आयडिया आहे' हा संवाद चांगलाच गाजला होता. आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, सारंग साठ्ये आणि रेणुका दफ्तरदार यांची या सिरीजमध्ये मुख्य भूमिका होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com