Dussehra 2023
Dussehra 2023 esakal
फूड

Dussehra 2023 : दसऱ्याच्या निमित्ताने बनवा स्पेशल गुळाचा मालपुआ, ट्राय करा 'ही' रेसिपी

Monika Lonkar –Kumbhar

Dussehra 2023 : नवरात्रीचे ९ दिवस दुर्गा मातेची नऊ रूपांमध्ये उत्साहात पूजा केली जाते. या नवरात्रौत्सवाची समाप्ती दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी होते. विजयादशमीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे.

विजयादशमीला दसरा असे ही म्हटले जाते. हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या सणाचे विशेष महत्व आहे. या दिवशी अन्यायावर न्यायाचा विजय झाल्यामुळे हा दिवस शौर्य आणि विजयाचे प्रतिक मानला जातो.

आजच्या दिवशी घरोघरी विविध पदार्थांची रेलचेल पहायला मिळते. आज खास दसऱ्याच्या निमित्ताने घरी आलेल्या पाहुण्यांचे तोंड गोड करण्यासाठी गोड मालपुआची स्पेशल रेसिपी आम्ही सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात गुळाच्या मालपुआची रेसिपी करण्याची ही सोपी पद्धत.

गुळाचा मालपुआ बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • किसलेला गूळ – अर्धी वाटी

  • गव्हाचे पीठ – ३ चमचे

  • वेलची पावडर – ४ चमचे

  • दूध – अर्धी वाटी

  • बडीशेप – १ चमचा

  • चवीनुसार मीठ

  • देशी तूप

  • तेल

  • ७-८ बदाम

  • पिस्ता चिरलेला

गुळाचा मालपुआ बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • गुळाचा मालपुआ बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये किसलेला गुळ घ्या.

  • या गुळामध्ये गव्हाचे पीठ, वेलची पावडर आणि बडीशेप मिक्स करून घ्या.

  • हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.

  • दुसऱ्या बाजूला आता साखरेचा पाक तयार करून घ्या.

  • आता या मिश्रणात दूध घालून हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळून घ्या.

  • दुसऱ्या बाजूला एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तूप घालून ते गरम करायला ठेवा.

  • तूप गरम झाल्यानंतर आता एका खोलगट चमच्याच्या मदतीने हे मिक्स केलेले बॅटर गरम तेलामध्ये घाला.

  • आता तुमचा मालपुआ दोन्ही बाजूंनी चांगला तळून घ्या.

  • दोन्ही बाजूंनी मालपुआ ब्राऊन दिसेपर्यंत तो तळून घ्या.

  • मालपुआ तळताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचा मालपुआ बाहेरून कुरकुरीत आणि आतल्या बाजूने मऊ दिसायला हवा.

  • आता तुमचा मालपुआ तयार आहे.

  • आता तयार केलेल्या साखरेच्या पाकामध्ये हा मालपुआ थोड्यावेळासाठी राहूद्या.

  • त्यानंतर, त्यावर चिरलेला पिस्ता आणि बदाम घालून सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT