फूड

Matar Paratha Recipe : नाश्त्यासाठी बनवा टेस्टी 'मटार पराठा', ही आहे सोपी रेसिपी..

तुम्ही कधी मटार पराठा खाल्ले आहे का? नसेल तर मटारचा पराठा बनवून नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणात खा. चला तर मग जाणून घेऊया रेसिपी.

सकाळ डिजिटल टीम

लोकांना नाश्त्यामध्ये गरमागरम पराठे खायला आवडतात. पराठ्यामध्ये अनेक प्रकारचे पर्याय आहेत, बाजारात विविध प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात, ज्यातून तुम्ही नाश्त्यासाठी स्वादिष्ट पराठे बनवू शकता. तुम्ही अनेकदा मुळा पराठा, कोबी पराठा, मेथी पराठा इत्यादी बनवून खात असाल, पण तुम्ही कधी मटार पराठा खाल्ले आहे का? नसेल तर मटारचा पराठा बनवून नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणात खा. चला तर मग जाणून घेऊया रेसिपी.

मटर पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • मटार - 1 कप

  • पीठ - एक कप

  • हिरवी मिरची - 2 चिरून

  • कोथिंबीर - 2 चमचे

  • कांदा - 1 चिरलेला

  • जिरे - अर्धा टीस्पून

  • आले - एक तुकडा किसलेला

  • लसूण

  • लिंबाचा रस - अर्धा टीस्पून

  • गरम मसाला- अर्धा टीस्पून

  • धने पावडर- अर्धा टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

मटार पराठा रेसिपी

पिठात थोडे मीठ आणि अर्धा चमचा तेल घालून चांगले मळून घ्या. झाकण ठेवून 10 मिनिटे राहू द्या. मटार सोलून घ्या, पाण्यात टाका आणि 5-7 मिनिटे उकळवा. यामुळे ते मऊ होतील. गाळणीतून पाणी गाळून घ्या. मटार आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. गॅसवर पॅन ठेवा. त्यात तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाका. नंतर त्यात चिरलेला कांदा, आले व लसूण घालून परता.

दोन ते तीन मिनिटे परतून घेतल्यावर मटार, लिंबाचा रस, कोथिंबीर, धने पावडर, गरम मसाला, या सर्व गोष्टी मिक्स करा. पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात मटारचे मिश्रण भरून पराठ्याच्या आकारात लाटून घ्या. लाटलेला कच्चा पराठा तव्यावर ठेवा. नंतर तेल टाकून चांगले गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या. स्वादिष्ट मटार पराठे तयार आहेत. हे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतील, कारण मटारमध्ये भरपूर प्रथिने असतात. त्यावर लोणी लावून तुम्ही ते खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास चहासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता.

DRDO Scientist Case : पाकिस्तानी हेर महिलेला गोपनीय माहिती पुरविल्याचा डॉ. प्रदीप कुरुलकरवर आरोप; १२ जानेवारीला होणार सुनावणी!

Pune Tractor Theft : ट्रॅक्टर चोरणारा सराईत गुन्हेगार बीडमध्ये अटकेत; १८० सीसीटीव्ही फुटेजचा तपास घेत वाघोली पोलिसांचा मास्टरस्ट्रोक!

Latest Marathi News Live Update : उद्यापासून निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार

Video: शुभमन गिलला T20 World Cup संघातून का वगळलं? गौतम गंभीरवर प्रश्नांचा भडीमार अन् मग...

Crime: सून सासऱ्यासोबत दारू प्यायची; मुलाला राग अनावर झाला, भलताच प्रकार उघडकीस आला, काय घडलं?

SCROLL FOR NEXT