five hottest chili available in India tips marathi news 
फूड

भारतात मिळणाऱ्या पाच सर्वात तिखट मिरची बाबत जाणून घ्या

अर्चना बनगे

कोल्हापूर:भारतामध्ये चटपटीत आणि तिखट खाण्याची पद्धत आहे आणि यासाठी वेगवेगळ्या पदार्थाच्या मसाल्यांचा वापर करतात. मसाल्याच्या बरोबरच जगातील सर्वात तिखट मिरची या ठिकाणी उत्पादित केली जाते. नेहमी आपण बाजारामध्ये जातो त्यावेळी आपण लाल मिरची खरेदी करतो परंतु  कमी लोकांना हे माहित आहे की जी आपण मिरची घरी आणतो ती कोणती आहे. भारतामध्ये तसे पाहिले तर दहा पेक्षा जास्त प्रकारच्या मिरच्या आहेत. परंतु त्यातील पाच मिरच्या असे आहेत जे त्याच्या तिखटपणा मुळे जास्त ओळखल्या जातात. जर तुम्हाला या पाच मिरची बाबत काहीच माहिती नाही तर चला या ठिकाणी आपण त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया .खासकरून भारतातील या पाच मिरच्या बाहेर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातात.


भुत जोलोकिया मिळण्याचे ठिकाण:  आसाम आणि नागालँड
 जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून या मिरचीला ओळखले जाते. याला घोष्ट चिली उमररॉक घोष्ट पेपर नागा चिली या नावाने सुद्धा ओळखले जाते. जर तुम्हाला सांगितले की ही मिरची खाणारे अक्षरशः हैवान होतात असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. खास करून या मिरचीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा करण्यात आली आहे, जेव्हा ही मिरची दुनियातील सर्वात तिखट मिरची म्हणून ओळखली जात होती. ही मिरची आपणास असा अनुभव देते की एकाच वेळी आपल्या शरीरामध्ये अनेक सुया टोचत आहेत. ही मिरची एका अनोख्या स्वादासाठी सुद्धा ओळखले जाते. 1000000 स्कोविल युनिट पेक्षा जादा तिखटपणा देऊन या मिरची चा मुकाबला कोणी करू शकत नाही.

गुंटूर मिरची मिळण्याचे ठिकाण  
आंध्र प्रदेश हे राज्य तिखट पदार्थ खाणारा राज्य म्हणून ओळखला जातो. याचे  श्रेय जाते ते गुंटूर या मिरचीला. गुंटूर आंध्र प्रदेश मधील एक जिल्हा आहे. या जिल्ह्यांमध्ये ही मिरची अधिक मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. ही मिरची श्रीलंका, बांगलादेश, साऊथ कोरिया, अमेरिका, लॅटिन अशा देशांमध्ये निर्यात केली जाते. गुंटूर मिरची  अत्यंत तिखट असते आणि आपल्या नेहमीच्या मिरची पेक्षा ती जास्त प्रभावित ठरते .


कंठारी मिरचीमिळण्याचे ठिकाण
केरळमधील ही मिरची अत्यंत प्रसिद्ध आहे जे शिजवल्यानंतर ती पांढरी होते. स्वादासाठी  सुद्धा ही मिरची अत्यंत उत्कृष्ट समजली जाते. या मिरचीचे स्वरूपच वेगळे असते आणि त्याचा वास ही अत्यंत चांगला असतो. तुम्हाला वाटेल की ही मिरची भुत जोलोकिया सारखी तिखट असेल परंतु असे नाही. तिखट असणारी ही मिरची केरळमधल्या अनेक डिश मध्ये वापरली जाते.

ज्वाला मिरची मिळण्याचे ठिकाण 
गुजरात खरेतर गोड खाण्यासाठी प्रसिद्ध आहे परंतु याठिकाणी उत्पादित होणारी ही मिरची अत्यंत तिखट आहे. गुजरात मधून येणारी ज्वाला लहान हिरवी मिरची ही खूप तिखट असते आणि अनेक राज्यांमध्ये त्याला मागणी असते. ज्वाला मिरची ही समोसा वडापाव मध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणि याचे स्वादही अत्यंत चांगले असते .जास्त शिजवल्यानंतर ही मिरची लाल होते . या मिरचीचे लोणचे तयार करण्यासाठी सुद्धा वापर केला जातो.

ब्याडगी मिरची मिळण्याचे ठिकाण 
 ही मिरची खासकरून कर्नाटका मध्येच मोठ्या प्रमाणात पिकते. कर्नाटकातील हावेरी जिल्‍ह्यातील  ही मिरची स्वादासाठी अत्यंत चांगली आहे. ही मिरची  परदेशात सुद्धा अत्यंत प्रसिद्ध आहे. वर दिलेल्या अन्य चार मिरचीच्या तुलनेत ही मिरची कमी तिखट आहे परंतु अत्यंत चटपटीत असे त्याचे स्वरूप आहे. ही मिरची रंग आणि त्याच्या  वासासाठी प्रसिद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant Statement : नवी मुंबई विमानतळ नामकरावरून सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे महत्वपूर्ण वक्तव्य; "धमक्या दिला तर कारवाई"

India Squad vs Afghanistan: नव्या दमाचा कसोटी संघ; वन डे संघातही प्रयोग, रोहित शर्मा, हार्दिक यांचा....

Mumbai News: दादर स्थानक बनणार अधिक सुरक्षित, वेगवान ! ३४ वर्षे जुनी सिग्नल प्रणाली बदलली

Nagpur Truck Accident: विटा घेऊन जाणारा ट्रक पलटी; तीन मजुरांचा जागीच मृत्यू, तीन जखमी

Latest Marathi News Live Update : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT