हरभळा डाळ sakal
फूड

वजन नियंत्रणात आणायचायं ? डायटमध्ये समावेश करा 'हरभळा डाळ'

सकाळ डिजिटल टीम

आपल्या दैनंदिन आहारात आपण अनेक डाळींचा उपयोग करतो.प्रथिने आणि पोषणयुक्त घटकचा आहारात नियमित समावेश असेल तर वजन कमी होण्यास याची मदत होते. हरभरा डाळ माफक दरात आपणास उपलब्ध होते. तुम्ही इतर खाद्यपदार्था सोबत हरभळा डाळीचा समावेश करू शकता. यात प्रथिने, झिंक, कॅल्शियम, प्रोटीन, फोलेट असते. ज्या लोकांना अशक्तपणा आहे अशांनी आहारात याचा समावेश करा. ज्यामुळे तुमचे पोट ही भरेल आणि वजन नियंत्रणात राहील. जाणून घेऊया हरभरा डाळीचा उपयोग

हरभळा डाळीचे फायदे

लठ्ठपणा कमी होतो

आज अनेकांना चिंता लट्ठपणा वाढण्याची असते. हरभरा डाळीचा उपयोग लठ्ठपणा कमी करण्यासाठी होतो. आहारात हरभरा डाळीचा समावेश केल्यास वजन कमी करण्यास मदत होते. हरभरा डाळीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे जास्त खाणे टाळता येते. तुमच्या डायटमध्ये याचा समावेश करा.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात हरभरा डाळीची समाविष्ट करा. यात प्रथिनांचे प्रमाण जादा असते. ज्याचा फायदा तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास होतो.

एनर्जी वाढते

अनेकदा आपल्याला आवश्यक असणारी ऊर्जा वेगवेगळ्या खाद्य पदार्थातून मिळत नाही. एनर्जीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हरभरा डाळ खाल्ली पाहिजे. यात शरीराला गरजेचे असणारे झिंक, कॅल्शियम, प्रोटीन, फोलेट असतात. जे एनर्जी वाढवण्यास मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT