Kavya Maran Under Fire as SRH Spend Big on Livingstone
esakal
Kavya Maran Under Fire as SRH Spend Big on Livingstone : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी नुकत्याच झालेल्या लिलावात सर्व फ्रँचायझींची बोली पाहता, त्यांनी भारताच्या युवा खेळाडूंना जास्त पसंती दाखवल्याचे दिसतेय. चेन्नई सुपर किंग्सने तर दोन अनकॅप्ड भारतीय खेळाडूंसाठी प्रत्येकी १४.२० कोटी मोजून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यात पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिलेल्या लायम लिव्हिंगस्टोनसाठी सनरायझर्स हैदराबादने दुसऱ्या फेरीत १३ कोटी मोजल्याने, सर्वांना अवाक् केले. SRH च्या या निर्णयावर आता टीका होताना दिसतेय.