Peanut Butter Sakal
फूड

Homemade Peanut Butter: अवघ्या 10 ते 15 मिनिटात घरच्या घरी तयार करा पीनट बटर, कसं ते घ्या जाणून

Homemade Peanut Butter: अगदी 10 ते 15 मिनिटात पीनट-बटर घरी तयार करता येऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

Homemade Peanut Butter: नाश्ता करताना अनेकांना प्रश्न पडतो रोज काय खायचे. अशावेळी काही जण जाम-ब्रेड, बटर-ब्रेड असे पर्यायही निवडतात. तर काहींना पीनट-बटरही ब्रेड किंवा पोळीला लावून खायला आवडते.

हे पीनट बटर घरी बनवता येईल का, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. पण पीनट-बटर घरी बनवता येऊ शकते.

विशेष म्हणजे पीनट बटरमध्ये ई-व्हिटॅमिन, प्रोटिन आणि चांगले फॅट्सही असतात. त्यामुळे आरोग्यासाठीही पीनट-बटर फायदेशीर ठरू शकते.

Peanut Butter

घरच्याघरी पीनट बटर कसे बनवता येईल हे आपण जाणून घेऊया.

  • साहित्य:

शेंगदाणे, मीठ, दालचिनी, मध

  • कृती:

शेंगदाणे चांगले भाजून घ्या. त्यानंतर ते पाखडून घ्या. भाजलेल्या शेंगदाण्याचे सर्व साल पाखडल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घ्यावेत. त्याच चवीनुसार मीठ टाकावे, तसेच दायचिनीचे दोन-तीन तुकडे टाकावेत.

तसेच जर गोडवा हवा असेल, तर मध टाका. जर गोडवा नको असेल, तर मध नाही टाकले तरी चालेल. तसेच ज्यांना गोडवा हवा आहे, परंतु मध आवडत नसेल, ते साखरही चवीनुसार टाकू शकतात. हे मिश्रण पूर्ण बारीक होऊन क्रिमी होईपर्यंत मिक्सरमध्ये वाटून घ्या.

ज्यावेळी या वाटणाला क्रिमी स्ट्रक्चर येईल, त्यावेळी तुमचे पीनट बटर तयार असेल. हे पीनट बटर बरणीत भरून तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: जागतिक बाजार घसरले, पण भारतीय बाजार चमकला! सेन्सेक्स 344 अंकांनी उसळला; Meta मुळे 'हा' शेअर तेजीत

Chhatrapati Sambhajinagar:हवाई सफरलाही महागाईची झळ!; छत्रपती संभाजीनगर-नवी मुंबई, बंगळुरू विमानसेवांच्या फेऱ्यांत होणार कपात

Yavatmal Couple Death : लग्नाला झाले होते अवघे 34 दिवस! 24-19 वयाच्या नवविवाहित जोडप्यानं विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन, दवाखान्यातून परतले अन्...

Vaibhav Sooryavanshi Next Match Date: पहिल्या सामन्यात १४ धावा, वैभवची पुढील मॅच कधी? जाणून घ्या India A चे पुढील वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : जागतिक बाजार घसरले असताना भारतीय शेअर बाजारात तेजी

SCROLL FOR NEXT