फूड

अळू खाऊन कंटाळलात? मग एकदा ट्राय करा अळकुड्यांची भाजी

एकदा नक्की ट्राय करा अळकुड्यांची भाजी

शर्वरी जोशी

पावसाळा सुरु झाला की बाजारापेठांमध्ये ठिकठिकाणी अळूची भाजी दिसू लागते. गावाकडच्या बायका मस्त शहरात हा अळू विकायला आणतात. या अळूमध्येही दोन प्रकार आहेत एक भाजीचा अळू आणि दुसरा वड्यांचा अळू. त्यामुळे पावसाळ्यात प्रत्येकाच्या घरी एकदा तरी अळूची भाजी आणि वड्या होतात. मात्र, या अळूमुळे अनेकदा अळकुड्यांकडे दुर्लक्ष होतं. बाजारात अळुंसोबतच अळकुड्यादेखील विक्रीसाठी असतात. आता अळकुड्या म्हणजे काय हे अनेकांना माहित नसेल. तर, अळकुड्या म्हणजे अळूचं कंद. थोडक्यात, सांगायचं झालं की अळकुड्या लावल्या की अळूची पानं येतात. विशेष म्हणजे अळूप्रमाणेच या अळकुड्यांचीही भाजी केली जाते. ही भाजी कशी करायची ते पाहुयात. (how-to-cook-alkudya-vegetable-recipes-easy-steps)

साहित्य -

अळकुड्या -अर्धा किलो

कांदा - ३ मोठे बारीक चिरुन

तेल - ४ मोठे चमचे

तिखट

मीठ

धणेपूड

हळद

आमचूर पावडर

फोडणीचं साहित्य

कृती -

प्रथम अळकुड्या स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्या. त्यानंतर गार झाल्यावर सोलून त्याचे बारीक तुकडे करुन घ्या. एकीकडे कढईत तेल गरम करुन त्यात फोडणी करा व कांदा उभा चिरुन परतून घ्या. कांदा लालसर झाला की त्यात हळद, तिखट, मीठ, धणेपूड, आमचूर पावडर मिक्स करा व २ मिनिटे परतून घ्या. त्यानंतर त्या अळकुड्यांच्या फोडी घाला व १ वाफ काढा. अशा प्रकारे अळकुड्यांची भाजी तयार. विशेष म्हणजे ही भाजी चिकट किंवा पूर्ण स्मॅश होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT