Besan ladoo  sakal
फूड

Besan ladoo recipe: बिना पाकाचे बेसन लाडु कसे तयार करायचे? ही आहे सोपी रेसिपी

शुद्ध तुपाचे बेसन लाडू तुम्ही घरी सहज बनवू शकता.

Aishwarya Musale

बेसनाचे लाडू म्हंटल की तोंडाला पाणी सुटते. बेसनाचे लाडू सगळ्यांनाच आवडतात. हे लाडू करताना पाक करावा लागत नाही. पाकाची भानगड नसल्यामुळे करायला सोपे पडतात. अतिशय सुंदर चवीचे हे अलवार लाडू सगळ्यांना खात्रीने आवडतील.

मस्त साजूक तुपातला खमंग बेसनाचा लाडू आणि तोही गूळ घातल्यामुळे खूपच चविष्ट लागतो. चला तर आज आम्ही तुम्हाला बिना पाकाचे बेसन लाडु कसे तयार करायचे हे सांगतो.

साहित्य

● 4 वाटी बेसन (डाळीचे पीठ)

● 3 वाटी चिरलेला गूळ

● 1 कप साजूक तूप

● 2 – 3 चमचा दूध

● 1 टीस्पून वेलची पावडर

● आवडीप्रमाणे सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ते)

● किसमीस

कृती –

बेसनाचे लाडू करताना सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे बेसन अगदी व्यवस्थित भाजणे. मंद आचेवर 5 मिनिटे आधी बेसन कोरडेच भाजा. नंतर त्यात थोडे थोडे तूप घालून बेसन डार्क बदामी रंगावर हलके होईपर्यंत भाजा.

सुरवातीला बेसन भाजायला जड लागले तरी जसजसे भाजून होईल तसे तूप सुटून बेसन हलके होईल.

भाजताना गॅस मंदच ठेवा. बेसन व्यवस्थित भाजले गेले आहे असे जेव्हा वाटेल त्यानंतरही आणखी 5 मिनिटे भाजा. तुम्ही जेवढे पीठ घेतले आहे त्या प्रमाणात भाजायला वेळ लागेल.

बेसन पाहिजे तितके हलके झाले की त्यात 2 – 3 टीस्पून गरम दूध सावकाश टाका. दूध टाकल्यावर बेसन फसफसून येईल आणि छान जाळी पडेल. दूध बेसनात संपूर्ण जिरेपर्यंत परतत राहा आणि मग गॅस बंद करा.

आता हे बेसन अगदी कोमट किंवा जवळ जवळ पूर्ण गार होऊ द्या. बेसन गार झाले की पॅनमध्ये चिरलेला गूळ घालून त्यात एक टीस्पून तूप घाला. मंद आचेवर गूळ फक्त पातळ किंवा मऊ करा. गुळाचा पाक करायचा नाहीये.

गूळ पातळ झाला की गॅस बंद करा. गॅस बंद केल्यावर 5 मिनिटे गूळ गार करा. 5 मिनिटांनी भाजलेल्या बेसनात हा गूळ घाला. वेलची पावडर आणि सुकामेवा घालून सगळं एकत्र करून छानपैकी मळून घ्या. किसमिस लावून लाडू वळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गलतीसे मिस्टेक! उपसरपंच बाईंनी स्वत:विरोधात दिलं मत, निकाल लागल्यावर समजलं; तहसीलदारांसमोर घातला गोंधळ

"त्याने पॅन्टमध्ये हात टाकला आणि.." मराठी अभिनेत्रीने उघड केला तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रकार !

Marathi Ekikaran Samiti Protests : दादरच्या कबुतरखान्याविरोधात मराठी एकीकरण समिती आक्रमक...पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Viral Video : धक्कादायक ! महिलेने बेकरीतून आवडीने खरेदी केला करी पफ, उघडताच निघाला साप, पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Updates Live: नागपूरमध्ये मनपाच्या धावत्या बसमध्ये शॉटसर्किटमुळे आग, प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT