Marathi Ekikaran Samiti Dadar Kabutarkhana protest 2025 : मुंबई उच्च न्यायालयाने दादर येथील कबुतरखाना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेकडून त्याबाबतची अंमलबजावणी केली जात असली तरी काही लोकांकडून न्यायालयाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.याच विरोधात आज मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली असून त्यांनी दादर येथे आंदोलन केलं. मात्र, या आंदोलनावेळी पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. कार्यकर्त्यांची धरपकड सुरु झाल्याने समितीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.