गलतीसे मिस्टेक! उपसरपंच बाईंनी स्वत:विरोधात दिलं मत, निकाल लागल्यावर समजलं; तहसीलदारांसमोर घातला गोंधळ

Khidrapur : आपण आपल्याच विरोधात मत दिलंय हे महिला उपसरपंचाला समजलं तेव्हा तिने तहसीलदारांसमोर गोंधळ घातला. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर इथं हा प्रकार घडला आहे.
Kolhapur: Woman Deputy Sarpanch Votes Against Herself by Mistake, Creates Scene After Result
Kolhapur: Woman Deputy Sarpanch Votes Against Herself by Mistake, Creates Scene After ResultEsakal
Updated on

कोल्हापूर (राहुल गडकर) : ग्रामपंचायतीत अविश्वास ठरावावेळी महिला उपसरपंचानं स्वत:च्याच विरोधात मतदान केलं. यामुळे महिलेला तिचं पद सोडण्याची वेळ आली. जेव्हा आपण आपल्याच विरोधात मत दिलंय हे महिला उपसरपंचाला समजलं तेव्हा तिने तहसिलदारांसमोर गोंधळ घातला. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर इथं हा प्रकार घडला आहे. गोंधळामुळे चुकून स्वत:विरोधात मत दिलं असं उपसरपंच पूजा पाटील यांनी म्हटलं. पण तहसिलदारांनी पूजा पाटील यांची फेरमतदानाची मागणी फेटाळून लावत न्यायालयात दाद मागा असा सल्ला दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com