पुण्यात अनेक ठिकाणी भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. शिवणे ते शिंदे पूल रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सकाळी वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्याने वाहतुकीच नियोजन कोलमडले, सकाळची वेळ असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे नांदेड सिटी रस्त्यावरून शिवणे रस्त्यावर जोडणाऱ्या रस्त्यांमूळे वाहतूक कोंडीत भर पडली असून पुणेकरांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.