फूड

पुण्यातील गुळाच्या चहाची काय आहे स्पेशॅलिटी? जाणून घ्या रेसीपी

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात चहा पिण्याची एक वेगळीच मज्जा असते. या ऋतूमध्ये चहा न पिणारे लोक देखील प्यायला सुरूवात करतात. शरीरामध्ये उर्जा टिकवून ठेवण्यासाठी लोक हे ड्रिंक पितात. पण हा चहा बनविण्याचे वेगवेगळी पध्दत आहे. काही लोक त्यात आले टाकतात, तर काही लोक बडिशेप टाकतात. मुंबईत चहामध्ये पुदीना टाकता आणि पुण्याबाबत सांगायचे झाले तर इथे गुळाचा चहा प्रसिद्ध आहे. या चहाची चव नेहमी प्यायल्या जाणाऱ्या जाणाऱ्या चहापेक्षा वेगळी आहे. पण थंडीच्या सिझनमध्ये गरम- गरम चहा पिण्यामुळे शरीरामध्ये उष्णता टिकून राहते. पुण्यातील या गुळाच्या चहाची खास रेसीपी आहे ज्यामुळे त्यांची चव सर्वांना आवडते. आज आम्ही तुम्हाला पुण्याच्या गुळाच्या चहाची रेसीपी सांगणार आहे. या चहामध्ये कोणता खास पदार्थ वापरला जातो ज्यामुळे त्याची चव आणखी चांगली होते हे देखील सांगणार आहोत. चला जाणून घेऊ हा चहा बनविण्याची पद्धत-

पुण्याचा स्पेशल गुळाचा चहा

साहित्य

लवंग, वियालची, काळी मिरी, दालचिनी, आले, गुलाबाची सुकलेल्या पाकळ्या, गुळ, सुंठ, तुलसी, दुध, चहा पावडर

कृती

गुळाचा चहा बनविण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये तुळशीचे पान टाका. आता लवंग, इलायची, काळी मिरी, दालचिनी, आले, गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या, सुंठ पाण्यामध्ये व्यवस्थित कुटुन घ्या. आता उकळलेल्या पाण्यामध्ये सर्व मिश्रण टाका. त्यामध्ये चहापावडर टाकून व्यवस्थित उकळून घ्या. आता त्यामध्ये गुळ टाका आणि व्यवस्थित उकळू द्या. मग त्यमध्ये दुध टाका आणि कमीत कमी 7 ते 10 मिनिट उकळा. गुळाचा चहा तयार आहे, चहा गाळून सर्व्ह करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT