Waranga khichdi recipe Esakal
फूड

Waranga khichdi recipe: मराठवाडा स्पेशल खमंग वारंगा खिचडी कशी तयार करतात?

जेवण करायचा कंटाळा आलेला असेल, आणि काहीही तडकभडक खायचं नसेल, तर घरोघरी हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे खिचडी!

सकाळ डिजिटल टीम

waranga khichdi recipe : साग्रसंगीत जेवण करायचा कंटाळा आलेला असेल, आणि काहीही तडकभडक खायचं नसेल, तर घरोघरी हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे खिचडी! मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा, मुखेड, कंधार, वारंगा हा परिसर तर खिचडीसाठी प्रसिध्द आहे. घरी किंवा बाहेरही ही खिचडी करताना तिच्यात जेवढं काही टाकता येईल तेवढं टाकलं जातं. म्हणजे खिचडी करताना भरपूर तेलावर आधी मोहरी-जिरं-लसणाची सणसणीत फोडणी दिली जाते. नंतर कांदा, टोमॅटो आणि घरात असेल ती भाजी(वांग्यापासून फ्लॉवरपर्यंत) टाकली जाते. मग काळा मसाला, गरम मसाला टाकला जातो. यातच धुतलेले तांदूळ आणि मूगडाळ टाकली जाते. हे सारं मिश्रण तेलावर झक्क परतल्यावर त्यात पुरेस पाणी आणि मीठ टाकून शिजवलं जातं. ही खिचडी शिजतानाही एखाद्या बिर्याणीपेक्षाही झकास सुगंध दरवळत असतो. मराठवाड्यात खिचडी आणि भजी हे समीकरण रूढ आहे. आजच्या लेखात आपण मराठवाडा स्पेशल खमंग वारंगा खिचडी कशी तयार करतात याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य

1) एक वाटी कोलम तांदूळ

2) अर्धा वाटी मुगाची डाळ साल वाली

3) तेल

4) एक चमचा मसाला

5) अर्धा चमचा हळद

6) अर्धा चमचा धणे-जीरे पावडर

7) अर्धा चमचा जीरे

8) अर्धा चमचा राई

9) अर्धा चमचा हिंग

10) अर्धा चमचा गोडा मसाला

11) हिरव्या मिरच्या

12) कढीपत्ता

13) मूठभर शेंगदाणे

14) थोडी कोथिंबीर

15) एक बारीक चिरलेला कांदा

16) एक बारीक चिरलेले टोमॅटो

17) चवीप्रमाणे मीठ

कृती

सर्वप्रथम तांदूळ व मुगाची डाळ स्वच्छ धुऊन घेणेनंतर गॅसवर ठेवून त्यात तेल घालनेतेल गरम झाल्यावर राई जीरे हीग ठेवलेले लसुन आलं कढीपत्ता ह्याची फोडणी करणेफोडणी झाल्यावर त्यात एक एक कांदा बारीक चिरून घालने व टोमॅटो घालून चांगले परतून घेणे.कांदा थोडा शिजल्यानंतर त्यात हळद मीठ मसाला धने जीरे पावडर गोडा मसाला शेंगदाणे सर्व घालून एकजीव करून मग नंतर तांदूळ व मुगाची डाळ घालून पाच मिनिटे चांगले परतून घेणे वरून कोथिंबीर घालावी. नंतर त्यात प्रमाणात पाणी घालून कुकर बंद करून तीन ते चार शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करावा. वाफ गेल्यानंतर कुकर उघडावे अशा रितीने वारंगा खिचडी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT