खाद्यतेल Sakal
फूड

तुम्ही कीटकनाशकयुक्त खाद्यतेल तर घरी आणत नाही ना? पाहा रिपोर्ट

तुम्ही कीटकनाशकयुक्त खाद्यतेल तर घरी आणत नाही ना? पाहा देशभरातील नमुन्यांचा रिपोर्ट

सकाळ वृत्तसेवा

आजकाल प्रत्येक वस्तूमध्ये भेसळ ही नित्याचीच बाब बनली आहे.

आजकाल प्रत्येक वस्तूमध्ये भेसळ ही नित्याचीच बाब बनली आहे. मात्र, यामुळे जीवितास धोका निर्माण करणाऱ्या घटकांमुळे अनेकांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात व शहरात भेसळ विरोधी पथके असूनही भेसळीवर नियंत्रण आणणे हे मोठे एक मोठे आव्हान ठरत आहे. कुठल्या वस्तूत भेसळ नाही, हे सर्वसामान्यांना समजणे कठीण असते. त्यामुळे नागरिक ब्रॅंडेड समजून त्या वस्तू डोळे झाकून घरी आणतात. मात्र या वस्तू स्लो पॉयझन (Slow Poison) बनून आरोग्यास Health) घातक ठरत आहे, हे कोणाला समजून येत नाही. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (Food Safety and Standards Authority of India - FSSAI) नुकतेच देशातील विविध ठिकाणांहून खाद्यतेलाचे (Edible Oil) नमुने घेतले असून, यातील खाद्यतेलामध्येही भेसळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. (In many states of the country, adulterated edible oil is being sold openly)

देशातील 587 जिल्हे आणि चार महानगरांमधील विविध खाद्यतेलाच्या 4,461 नमुन्यांपैकी सुमारे 2.42 टक्के नमुने सुरक्षा मानकांशी जुळत नसल्याचे आढळून आले आहे. यामध्ये अफलाटॉक्‍सिन (Aflatoxin), कीटकनाशकांचे (Pesticide) अवशेष आणि जड धातूंचे मिश्रण भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसआर) निर्धारित केलेल्या पातळीपेक्षा जास्त होते.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) बुधवारी ही माहिती दिली. प्राधिकरणाने नमूद केले की, गुणवत्ता श्रेणीतील सुमारे 2.42 टक्के (108) नमुने मानदंडांचे पालन करत नाहीत.

पोषक दावे देखील ठरले फोल

तसेच लेबल मिसब्रॅंडिंग श्रेणीतील (Label Misbranding Category) सुमारे 572 (12.8 टक्के) नमुने व्हिटॅमिन ए (Vitamin A) आणि व्हिटॅमिन डी (Vitamin D) यांसारख्या पोषक तत्त्वांनी युक्त असल्याच्या दाव्याचे पालन होत नव्हते. तसेच काही नमुने शेल्फ- लाइफ मानदंड आणि ऍडिटिव्ह्‌जच्या विहित मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी झाले.

मोहीम अधिक तीव्र करण्याचे आवाहन

25-27 ऑगस्ट 2020 दरम्यान केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणाचे निष्कर्ष प्रसिद्ध करून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने राज्यांना तेलातील भेसळ रोखण्यासाठी अंमलबजावणी मोहीम तीव्र करण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT