Dahi Chutney Toast  sakal
फूड

Dahi Chutney Toast: फक्त ५ मिनिटांत बनवा झटपट आणि चविष्ट 'दही चटणी टोस्ट'!

Curd Chutney Toast in Just 5 Minutes: फक्त ५ मिनिटांत तयार होणारा झटपट आणि चविष्ट दही चटणी टोस्ट आहे नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय!

Anushka Tapshalkar

How To Make Dahi Chutney Toast In 5 Minutes: दिवसाची सुरुवात एनर्जेटिक झाली तर दिवसभर आपल्याला काम करायला ताकद मिळते. त्यासाठी नाश्ता अतिशय महत्त्वाचा असतो. पण ऑफिसच्या घाई-गडबडीत तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि काहीतरी झटपट व चविष्ट खायचं असेल, तर ही "दही चटणी टोस्ट" रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. गरमागरम टोस्ट आणि तोंडाला पाणी आणणारी दही चटणी मिळून एक भन्नाट कॉम्बिनेशन तयार करतं. चला तर मग पाहूया ही सोपी रेसिपी.

साहित्य

  • १ कप दही

  • १/२ टीस्पून लाल तिखट किंवा रेड चिली फ्लेक्स

  • १/४ टीस्पून मिरी पूड

  • चवीनुसार मीठ

  • थोडीशी कोथिंबीर

  • २-३ लसूण पाकळ्या

  • १-२ हिरव्या मिरच्या

  • ब्रेड स्लाइसेस

  • लोणी/ बटर/तूप

कृती

  • एका बाऊलमध्ये दही घेऊन त्यात लाल तिखट, मिरी पूड आणि मीठ घाला.

  • मिक्सरमध्ये लसूण, हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर सोबत थोडंसं पाणी घालून वाटून घ्या.

  • हे वाटण दह्यात मिसळा आणि सर्व नीट एकत्र करा.

  • आता ब्रेडचे स्लाइसेस या मिश्रणात दोन्ही बाजूंनी बुडवा.

  • तवा गरम करून त्यावर लोणी/ बटर/तूप घाला आणि ब्रेड स्लाइस दोन्ही बाजूंनी खरपूस टोस्ट करून घ्या.

  • गरमागरम दही चटणी टोस्ट तयार!

ही चवदार रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या चहा सोबत किंवा लहान मुलांसाठी डब्यातही परफेक्ट आहे. कमी वेळात आणि कमी साहित्य वापरून तयार होणारा हा हेल्दी आणि टेस्टी पर्याय नक्कीच ट्राय करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT