Chicken Manchurian Real Origin Story sakal
फूड

Chicken Manchurian Real Origin Story: चिकन मंच्युरियन खरंच चायनीज आहे का? सत्य ऐकून थक्क व्हाल!

Who Invented Chicken Manchurian: चिकन मंच्युरियनचे नाव जरी 'मंच्युरियन' असले तरी ह्या पदार्थाचा चीनशी काहीही खास संबंध नाही! जाणून घ्या खरे मूळ

Anushka Tapshalkar

What Is The Real Origin Of Chicken Manchurian: भारतातच नाही तर भारताबाहेरही प्रसिद्ध असलेला आणि बऱ्याच जणांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चिकन मंच्युरियन. रस्त्याच्या छोट्या स्टॉल्सपासून मोठ्या हॉटेलपर्यंत आणि अगदी आपल्या घरात सुद्धा हा पदार्थ बनवला जातो. एवढेच नाही तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सर्वांच्या मनावर राज करतो. पण तुम्हाला माहित आहे का, की नाव जरी 'मंच्युरियन' असलं तरी ह्या पदार्थाचा चीनशी काहीही खास संबंध नाही?

ही एक पूर्णपणे भारतात तयार झालेली रेसिपी आहे, ज्याची एक चवदार आणि खास अशी कहाणी आहे. चला तर मग, जाणून घेऊया, हा पदार्थ नेमका कसा आणि कुठून आला.

चिकन मंच्युरियन आणि मुंबई कनेक्शन

वेगवेगळे मसाले, भाज्या आणि चायनीज सॉसेस एकत्र करून तयार होणाऱ्या या पदार्थाचा मुख्य संबंधच मुंबईशी आहे. कारण फक्त चित्रपटाची दुनिया, उक्तृष्ट समुद्रकिनारा एवढ्यासाठीच नाहीतर इथल्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीसाठी देखील प्रसिद्ध असलेल्या मुंबईतच जन्म झालाय चिकन मंच्युरियनचा.

1970 साली या पदार्थाची मुंबईत सुरुवात झाली. याच काळात इंडो-चायनीज खाद्यसंस्कृतीचा जन्म झाला. आणि पुढे सर्वत्र या फ्युजनला पसंती मिळाली.

यांनी लावला चिकन मंच्युरियनचा शोध

चिकन मंच्युरियनची कहाणी सुरु होते शेफ नेल्सन वांग यांच्यापासून. भारतीय-चायनीज वंशाचे शेफ, कोलकात्यात जन्माला आले होते. नंतर मुंबईला आल्यावर त्यांनी क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये काम करायला सुरुवात केली.

एकदा एका ग्राहकाने त्यांना काहीतरी वेगळं बनवायला सांगितलं तेव्हा त्यांनी चिनी सॉसेस आणि भारतीय मसाले आणि खास स्टाईलने तळलेले चिकन यांचे भन्नाट मिश्रण तयार केले आणि त्यातून जन्म झाला 'चिकन मंच्युरियन'चा! ही डिश लोकांना इतकी आवडली की त्यांनी 1983 मध्ये 'चायना गार्डन' नावाचं स्वतःचं रेस्टॉरंटही सुरू केलं.

चिकन मंच्युरियनच्या यशानंतर गोबी मंच्युरियन, पनीर मंच्युरियन, हक्का नूडल्स, शेजवान राइस असे अनेक इंडो-चायनीज पदार्थ तयार झाले. हे पदार्थ नावाने जरी चायनीज वाटत असले, तरी त्या सर्वात भारतीय मसाल्यांची खास चव असते.

चिकन मंच्युरियनच्या नावामागील कहाणी

‘मंच्युरियन’ हे नाव चीनमधल्या मंच्युरिया या जागेवरून घेतले आहे, पण या डिशचा त्या ठिकाणाशी काहीही संबंध नाही. हे नाव फक्त थोडेसे चायनीज वाटावे म्हणून ठेवले होते, जे लोकांना खूप आवडले.

आज चिकन मंच्युरियन हा पदार्थ अनेक पार्टीजमध्ये, हॉटेलमध्ये, फूड स्टॉलवर आणि घरी सर्वत्र दिसते. मग ग्रेव्हीमध्ये असो किंवा ड्राय, फ्रायड राईससोबत असो किंवा नूडल्ससोबत, हा पदार्थ नेहमीच चवदार लागतो आणि त्यामुळे तो अनेकांची पसंतही आहे. पण चिकन मंच्युरियनचे खरे मूळ चीनमध्ये नाही, तर आपल्या मुंबईतच आहे हे आज तुम्हाला कळाले असेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup 2025 Final: दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध जिंकला टॉस; पावसाच्या व्यत्ययानंतर सामन्याला सुरुवात होणार...; पाहा प्लेइंग इलेव्हन

Confirm Railway Ticket : कितीही मोठी वेटिंग लिस्ट असुदे; 100% कन्फर्म रेल्वे तिकीट मिळणारच..'ही' 1 ट्रिक आयुष्यभर लक्षात ठेवा

Mexico Blast: भीषण! सुपरमार्केटमध्ये भयंकर स्फोट; २३ जणांचा मृत्यू, ४ चिमुकल्यांचाही समावेश, १२ जण जखमी

Delete Online Data: इंटरनेटवरुन तुमचा डेटा डिलिट करायचाय अन् हॅक्सर्सपासून सुरक्षित राहायचय? मग फॉलो करा 'या' स्मार्ट ट्रिक्स

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! लाखो रुपयांचा पगार मिळणार; 'असा' करा अर्ज

SCROLL FOR NEXT