Ragi Cutlet sakal
फूड

Ragi Cutlet Recipe : नाश्त्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी 'नाचणीचे कटलेट', जाणून घ्या सोपी रेसिपी

वाढत्या वयाच्या मुलांसाठी तर नाचणी खूपच उपयोगी आहे. नाचणीची भाकरी खाण्यास कंटाळा करणारी मुलं, नाचणीपासून बनवलेले कटलेट मात्र आवडीने खातील.

सकाळ डिजिटल टीम

नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. यात अनेक महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. वाढत्या वयाच्या मुलांसाठी तर नाचणी खूपच उपयोगी आहे. तसेच यामुळे वजन कमी होण्यासही मदत होईल. नाचणीची भाकरी खाण्यास कंटाळा करणारी मुलं, नाचणीपासून बनवलेले कटलेट मात्र आवडीने खातील, यात शंकाच नाही! नाश्त्यासाठी हेल्दी आणि चविष्ट नाचणीचे कटलेट बनवा. चला तर मग जाणून घेऊया नाचणीचे कटलेट कसे तयार करायचे.

लागणारे साहित्य

  • 1/4 कप नाचणीचे पीठ

  • 1 कांदा

  • 1 टीस्पून लसूण पेस्ट

  • 1 टीस्पून धने पावडर

  • चवीनुसार मीठ

  • 4 चमचे ब्रेड क्रम्ब्स

  • 2 उकडलेले बटाटे

  • 1 गाजर

  • 1 टीस्पून लाल मिरची पावडर

  • 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर

  • 2 टीस्पून ऑइल

नाचणीचे कटलेट कसे बनवायचे?

सर्व प्रथम कांदा आणि गाजर बारीक चिरून घ्या. दोन्ही वस्तू एका भांड्यात ठेवा. आता उकडलेले बटाटे मॅश करा. मॅश केलेले बटाटे चिरलेल्या भाज्यांसह मिसळा. आता त्यात नाचणीचे पीठ, मीठ, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला आणि लसूण पेस्ट घाला. ते चांगले मिसळा आणि त्याचे मिश्रण तयार करा. त्यात तीन ते चार चमचे पाणी घालून परत एकदा चांगले मिसळा.

एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्ब्स ठेवा. तयार मिश्रणापासून लहान कटलेट बनवा आणि ब्रेड क्रम्ब्समध्ये रोल करा. आता कढईत तेल गरम करून त्यात कटलेट टाका. कटलेट गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा. त्यात चवीनुसार इतर मसाले देखील टाकू शकता. ते अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यात इतर भाज्याही टाकता येतात.

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

ऊसतोड महिलांचं जगणं मांडणाऱ्या 'कूस' लघुपटाला राज्यस्तरीय तिसरे पारितोषिक

Latest Marathi News Updates : घनसावंगी शिवारातील पाझर तलाव फुटला

SCROLL FOR NEXT