momos  sakal
फूड

Momos Side Effects: तुम्ही मोमोज खाण्याचे शौकीन असाल तर सावधान! होऊ शकतात गंभीर आजार

जगभरात मोमोज प्रेमींची संख्या मोठी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Momos Side Effects : जगभरात मोमोज प्रेमींची संख्या मोठी आहे. मोमोज प्रामुख्याने नेपाळ, तिबेट आणि भारतात प्रसिद्ध आहेत. मोमोज हे विशेषतः उत्तर भारतात लोकप्रिय स्ट्रीट फूड आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, मोमोज हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. मोमोज खाल्ल्याने अनेक आजार होण्याची शक्यता असते.

रक्तातील साखरेची पातळी वाढणे :

मोमो हे रिफाइंड पिठापासून बनवले जातात आणि रिफाइंड पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज मोमोज खाल्ले तर विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांमध्ये शुगर लेव्हल जास्त असू शकते आणि ज्यांना डायबेटिस नाही त्यांच्यामध्ये शुगर लेव्हल जास्त असल्याने डायबिटीज होण्याची शक्यता असते.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

वजन वाढणे :

मोमोज बनवण्यासाठी पीठ लागते. पिठात स्टार्चचे प्रमाण जास्त असते. अशावेळी स्टार्चच्या सेवनाने वजन वाढू शकते. याशिवाय मैदा कोलेस्ट्रॉलची पातळीही वाढवतो. म्हणूनच जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर मोमोजपासून अंतर ठेवा.

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते :

रस्त्याच्या कडेला मिळणारे मोमोज चवदार वाटत असले तरी त्याचे तोटे अनेक आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीनेही ते आरोग्यदायी नाही. रोजच्या रोज मोमोजचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला काही ना काही शारीरिक समस्या होत राहतील.

टायफॉइड होऊ शकतो :

मोमोजच्या सेवनामुळे टायफॉइडसारखे आजारही होऊ शकतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्यांवर मिळणाऱ्या मोमोजच्या सेवनाने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत टायफॉइड होण्याची शक्यता वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारणारी व्यक्ती केवळ ‘मुस्लिम’ राहते, High Court ने काय सांगितलं?

IND vs IRE, T20I: पोरं तर पोरं, आयर्लंडच्या पोरींनी पण भारताला हरवल्याचं केलं भन्नाट सेलिब्रेशन; Video Viral

Latest Marathi News Live Update : महापौर हिमगौरी आडके अतिक्रमणांविरोधात रस्त्यावर, अनधिकृत बांधकामांवर थेट कारवाई

Tilari National Park : कोकणचे 'अ‍ॅमेझॉन' आता बदलणार! सिंधुदुर्गात होणार अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने भव्य नॅशनल पार्क, जाणून घ्या सरकारचा मेगा प्लॅन?

Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT