Jawar Paratha Recipe Sakal
फूड

Morning Breakfast: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार अन् पौष्टिक ज्वारीचा पराठा, जाणून घ्या सोपी रेसिपी

Jawar Paratha Recipe: सकाळी नाश्त्यात पौष्टिक आणि चवदार पदार्थ खायचा असेल तर ज्वारीचा पराठा बनवू शकता.

Puja Bonkile

Protein Rich Jawar Paratha: अनेक लोक सकाळी नाश्त्यात चवदार आणि पौष्टिक पदार्थ खायला आवडतात. तसेच सकाळी नाश्ता करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा राहते. पण रोज नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न पडतो. यामुळे आज आम्ही तुम्हाला ज्वारीचा पौष्टीक आणि चवदार पराठा कसा बनवावा हे सांगणार आहोत. हा पराठा बनवायला सोपा आणि चवदार आहे. चला तर मग जाणून घेऊया पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती काय आहे.

ज्वारीचा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ज्वारीचे पीठ- १ कप

गव्हाचे पीठ -१/२ कप

ओवा - ४ चमचे

कांदा पात

आलं-लसूण पेस्ट

हिरवी मिरची

हळद

कोथिंबीर

मीठ

ज्वारीचा पराठा बनवण्याची कृती

ज्वारीचा पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात ज्वारीचे पीठ आणि गव्हाचे पीठ मिक्स करावे. नंतर त्यात ओवा, कोथिंबीर,बारिक कांदा,हळद,मीठ,बारिक हिरवी मिरची,आलं-लसूण पेस्ट, किसलेला गाजर टाकून चांगले मिक्स करावे आणि थोडा वेळ झाकूण ठेवावे. नंतर छोटे गोळे करून त्याचे पराठे बनवावे. दोन्ही बाजून तूप लावून चांगले भाजावे. तयार आहेत गरमा गरमा ज्वारीचा पराठा. तुम्ही हिरवी चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Visit : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; मुख्यमंत्र्यांना पत्रानंतर आता पुण्यातील उपोषणस्थळी देणार भेट

Dry Fruits Price: रक्षाबंधन, गणेशोत्सवाआधी खिशाला मोठा फटका! कांदा-साखर कमी होती की काय, आता ड्रायफ्रूट्सही महागले, वाचा नवे दर...

कोल्हापुरात ‘होम मिनिस्टर’चा डंका! २,५०० हून अधिक महिलांनी औक्षण करत रचला विश्वविक्रम

Marathi News Live Updates : राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan 2026 Gift Ideas: बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणतील ‘या’ ८ गोष्टी; पाहा एका-पेक्षा-एक भन्नाट गिफ्ट आयडियाज

SCROLL FOR NEXT