Besan Paneer Sandwich: Sakal
फूड

Besan Paneer Sandwich: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा बेसण पनीर सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Besan Paneer Sandwich: एकाच प्रकारचे सँडविच खाऊन बोर झाले असाल तर बेसण पनीर सँडविच बनवू शकता.

पुजा बोनकिले

Besan Paneer Sandwich: अनेक लोक नाश्त्यात ब्रेड पकोडा किंवा ब्रेड सँडविच खातात. पण रोज हेच खाऊन बोर झाले असाल तर ब्रेडपासून नव्या प्रकारे सँडविच बनवू शकता. यामध्ये पनीर आणि भाज्याचा वापर केल्याने पोट देखील भरून राहते. तुम्हाला दिवसभर थकवा देखील जाणवणार नाही. चला तर मग जाणून घेऊया बेसण पनीर सँडविच कसे बनवाल.

बेसण पनीर सँडविच बवनण्यासाठी लागणारे साहित्य

कांदा

टोमॅटो

सिमला मिरची

३ टेस्पून बेसन

4 टीस्पून दही

1 टीस्पून मीठ

1 टीस्पून लाल मिरची पावडर

1/2 टीस्पून हळद पावडर

बारिक चिरलेली भाज्या

कोथिंबीर

बटर

ओरेगॅनो

मीठ

काळी मिरी

कोथिंबीर पुदीना चटणी

बेसण पनीर सँडविच बनवण्याची कृती

सर्वात आधी टोमॅटो, कांदा , सिमला मिरची बारिक चिरून घ्यावे. नंतर एका भांड्यात बेसण,दही,मीठ,लाल तिखट,हळद बारिक चिरलेल्या वरील भाज्या,कोथिंबीर, पाणी मिक्स करावे. नंतर त्यात ब्रेड दोन्ही बाजून डिप करावे आणि गरम तव्यावर दोन्ही बाजून बटर लावून भाजून घ्यावे. नंतर पनीर बटर लावून भाजून घ्यावे. आता ब्रेडच्या एका तुकड्यावर हिरवी चटणी लावावी त्यावर पनीर ठेवावे आणि ब्रेडचा दुसरा तुकडा ठेवावा. तुमचे बेसण पनीर सँडविच तयार आहे. लहान मुलांना डब्ब्यात किंवा सकाळी नाश्त्यात आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Pune Municipal Election : पुण्यात ३५ लाख ५१ हजार मतदार! १० प्रभागातील मतदार संख्या लाखाच्या पुढे, प्रचारात उमेदवारांची होणार दमछाक

Kolhapur News: जिल्ह्यातील ८४ सहकारी दूध संस्थांतील कारभाऱ्यांकडून निवडणुकीसाठी टाळाटाळ

Ashes 2025-26 Details: सुरू होतोय ऍशेस मालिकेचा रोमांचक थरार! भारतात कुठे आणि कसे पाहाणार सामने? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT