National Sugar Cookies Day sakal
फूड

National Sugar Cookie Day: ‘नॅशनल शुगर कुकीज डे’निमित्त कुकीज खा आणि रूसवे, फुगवे दूर करा!

How sugar cookies helped women become self-reliant: नॅशनल शुगर कुकीज डे निमित्त आज घरच्या घरी कुकीज तयार करा आणि गोडवा पेरत नात्यांतील दुरावा मिटवा.

सकाळ वृत्तसेवा

थोडक्यात:

  1. राष्ट्रीय साखर कुकीज दिवस दरवर्षी ९ जुलै रोजी साजरा केला जातो, गोड आणि पारंपरिक कुकीजचा आनंद घेण्यासाठी.

  2. साखर कुकीज या आनंद, आपुलकी आणि घरच्या घरी तयार होणाऱ्या प्रेमळ पाककृतीचे प्रतीक आहेत.

  3. या दिवशी गोड कुकीजच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांशी पुन्हा एकदा नातं घट्ट करण्याची ही एक सुंदर संधी असते.

Story of Archana Bagde and Sugar Cookies Business: दैनंदिन आयुष्यात चहा जितका महत्त्वाचा ठरतो, तितक्याच प्रेमाने आता कुकीजही जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. चहा आहे, पण कुकीज कुठं?, असा प्रश्न विचारणारे आता सर्वत्र दिसून येतात. लोकप्रिय आणि स्वादिष्ट साखर कुकीजच्या सन्मानार्थ दरवर्षी ९ जुलै हा दिवस ‘राष्ट्रीय साखर कुकीज दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या खास दिवशी केवळ कुकीज खाण्याचा आनंदच नव्हे, तर त्यामागील सांस्कृतिक महत्त्वही अधोरेखित केले जाते.

नागपूरच्या चैतन्यनगर येथील अर्चना बागडे या मैत्री बचत गटाच्या माध्यमातून साखर कुकीज तयार करून स्वतःचे बेकरी उत्पादन युनिट चालवतात. कोरोनाच्या काळात पतीचा कॅटरिंग व्यवसाय बंद पडल्यावर त्यांनी कौशल्याच्या बळावर विश्वास ठेवत कुकीज बनवण्याचा गृहउद्योग सुरू केला.

सुरुवातीला घरच्या घरी कुकीज तयार करून विक्री सुरू केली. आता मिक्स फ्रूट, ड्राय फ्रूट, जिमजॅम, कोकोनट, नानखटाई, आटा, रवा, जिरा आदी विविध प्रकारचे शुगर बिस्किट्‌स तयार करतात. सहा कामगारांच्या मदतीने दररोज २५ ते ३० दुकानांमध्ये कुकीज पोहोचविले जात असल्याची माहिती अर्चना बागडे यांनी दिली.

इतिहास गोड आठवणींचा

१७०० च्या दशकात अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया राज्यातील नाझरेथ येथे कुकीज तयार करणे सुरू झाले. जर्मन प्रोटेस्टंट वसाहतींमध्ये तयार झालेली ही गोलसर, बटरचा उपयोगकरीत तयार झालेली कुकी पुढे ‘नाझरेथ कुकी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. अमेरिका आणि युरोपमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या साखर कुकीजचा स्वाद आता भारतातही रुजला आहे. आज भारतीय घरांमध्येही सकाळच्या किंवा दुपारच्या चहा सोबत कुकीज अनिवार्य झाले आहे. याच कुकीजमुळे अनेक महिलांना नवा आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचा नवा मार्ग गवसला आहे.

खास प्रसंगात आगळी भेट

व्हॅलेंटाईन डे, दिवाळी, ख्रिसमस किंवा वाढदिवस कोणताही खास प्रसंग असो, कुकीज ही गोड भेट म्हणून आता लोकप्रिय झाली आहे. कोणी रूसले, फुगले असेल तर त्यांना कुकीज देऊन नात्यांमधील गोडवा वाढवण्याचा हा उत्तम पर्याय ठरतो. म्हणूनच, आजचा राष्ट्रीय साखर कुकीज दिवस हा केवळ एक खाद्यसण नाही, तर संघर्षातून उभ्या राहिलेल्या अनेक महिलांच्या आत्मनिर्भरतेचा, गोडव्याचा आणि यशाचा सण ठरतो.

FAQs

  1. नॅशनल शुगर कुकी डे कधी साजरा केला जातो?
    नॅशनल शुगर कुकी डे दरवर्षी ९ जुलै रोजी साजरा केला जातो.

  2. शुगर कुकी डे का साजरा केला जातो?
    हा दिवस गोड कुकीजचा आनंद घेण्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसोबत गोड क्षण शेअर करण्यासाठी साजरा केला जातो.

  3. शुगर कुकी डे घरी कसा साजरा करता येईल?
    तुम्ही घरच्या घरी कुकीज बनवू शकता, मुलांसोबत डेकोरेशन करू शकता किंवा मित्र-नातेवाईकांना शेअर करू शकता.

  4. शुगर कुकीज बनवणे सोपे आहे का?
    होय, शुगर कुकीज बनवण्यासाठी थोडेच साहित्य लागते आणि त्या नवशिक्यांसाठीही अगदी सोप्या असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaheen Afridi : शाहिन आफ्रिदी वर्ल्डकपला मुकणार? बिग बॅश स्पर्धेत क्षेत्ररक्षण करताना गुडघा दुखावला

New Year Recharge : पटकन करा रिचार्ज, लवकरच बंद होणार आहे 1 रुपयचा प्लॅन; मिळणार 30 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, 60GB डेटा

Latest Marathi News Live Update : मनसेचे मुंबईतील उमेदवार राज ठाकरेंच्या भेटीला

National Flower : वर्षभर सगळ्यांत जास्त फूलं देणारं झाडं कोणतं? याला म्हटलं जातं 'प्राइड ऑफ इंडिया'..लाखो लोकांना माहिती नाही उत्तर

Viral Video : अतूट दोस्तीने मृत्यूलाही हरवलं ! मित्राला वाचवायला मगरींशी भिडली माकडांची टोळी, भावूक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT