Fruits Salad Recipe:  Sakal
फूड

Navratri Fast Recipe: नवरात्रीत सकाळी नाश्त्यात बनवा फ्रूटसॅलड, दिवसभर राहाल उत्साही

Fruits Salad Recipe: तुम्हीही नवरात्रीचा उपवास करणार असाल तर सकाळी नाश्त्यात फ्रुटसॅलेड बनवू शकता.

Puja Bonkile

Fruits Salad Recipe: शारदीय नवरात्रीला हिंदू धर्मात खुप महत्व आहे. यंदा ३ ऑक्टोबरला नवरात्रीचा सण साजरा केला जाणार आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार मनोभावे पूजा केल्यास सर्व संकट दूर होतात. अनेक लोक नऊ दिवस उपवास करतात. तुम्हीही नवरात्रीचा उपवास करणार असाल तर सकाळी नाश्त्यात फ्रुटसॅलेड बनवू शकता. फळं खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच फळं खाल्याने दिवसभर थकवा जाणवणार नाही. तसेच शरीरातील पोषक घटक कमी होणार नाही. हा फ्रुटसॅलड बनवणे सोपा असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया फ्रुटसॅलड कसा बनवतात आणि कृती काय आहे.

फ्रूटसॅलड बनवण्यासाठी लागणारे साहित्य

दोन मोठे चिकू

१ मोठे संत्र

२ मोठी मोसंबी

१ पेरू

१ डाळिंब

१ सफरचंद

पाव लिटर व्हॅनिला आइस्क्रीम किंवा आपल्या आवडीचे आइस्क्रीम

७-८ चमचे साखर

फ्रूटसॅलड बनवण्याची कृती

फ्रुटसॅलड बनवण्यासाठी सर्वात आधी सर्व फळे धुऊन घेऊन त्यांची साले काढावीत.

बिया काढून घ्याव्यात.

सर्व फळे बारीक चिरावीत.

डाळिंबाचे दाणे वेगळे करावेत.

संत्र-मोसंबीची बी प्रत्येक पाकळीतून काढून घ्यावी.

संत्र-मोसंबीचे पापुद्रेही काढून घ्यावेत.

त्याचे छोटे तुकडे करून ही सर्व फळे मोठ्या काचेच्या भांड्यात काढून घ्यावीत.

त्यात सात ते आठ मोठे चमचे साखर घालावी.

आवडते आइस्क्रीम घालावे.

तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये सुकामेवासुद्धा घालू शकता.

हे सर्व मिश्रण एकत्र करून फ्रिजमध्ये ठेवावे.

तयार झाले आपले फ्रूटसॅलड.

हे सॅलड आपण पुरी, पोळी, चपाती इत्यादींबरोबर खाऊ शकतो.

लहान मुले हे आवडीने खातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT